
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
यवतमाळ : आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद आता चांगलाच पेटलाय. बच्चू कडू यवतमाळमध्ये बोलताना त्याचाच प्रत्यय आला.
धर्म कधीच धोक्यात येत नसतो, धोक्यात येतो तो नेता!’, कुणाचंही नाव न घेता असं बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी हा टोला नक्की कुणाला लगावला? याबाबत चर्चा झाली. बच्चु कडू यांनी हा टोला रवी राणा यांना लगावल्याचं बोललं जातंय.
मी 15 वर्ष मेहनत केली. दिव्यांगांसाठी काम केलं. 150 गुन्हे दाखल करून घेतले. सत्ता हा महत्वाचा विषय नाही. लोकांचे प्रश्न सुटायला हवेत. कार्यकर्ते हे सेवेच्या भावनेतून पेटून उठला पाहिजे. दोन शाखा कमी करा, पण मजबूत शाखा तयार करा, असं बच्चू कडू म्हणाले.