
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा : अयोध्या येथे राम मंदिर निर्माणासाठी १९९२ साली अनेकांनी संघर्ष केला यावेळी काही रामभक्तांना जीवदान सुद्धा द्यावे लागले, आपले सर्वस्व अर्पण करण्याची जिद्द घेऊन निघालेल्या राम भक्तांपैकी एक म्हणजे राम कोठारी आणि शरद कोठारी बंधू यांच्या बलीदान दिनानानिमित देशभरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दला कडून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.
लोहा शहरात येथे दि.३० रोजी रविवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले यावेळी श्री गोळवळकर गुरुजी रक्तपेढी कडून रक्त संकलित करण्यात आले, यावेळी असंख्य राम भक्तांनी रक्तदान कार्यक्रमास भेट दिली व आपण सुद्धा या समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने रक्तदान केले, यावेळी १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून त्यांना रक्तपेढी कडून प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले.
विश्व हिंदू परिषदेचे मठ मंदिर प्रमुख पुरणनाथजी महाराज यांनी शिबिराचे उद्घाटन केले तर भारत सावकार तेललवार,कांता सावकार बिडवई,बंडू पाटील वडजे,युवराज वाघमारे,अविनाश पा.पवार,विनायक कोपणर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी विहिंप तालुका अध्यक्ष अंबादास पा.पवार,बजरंग दल तालुका अध्यक्ष गणेश पा.कल्याणकर,तालुका मंत्री विशाल घंटे,सहमंत्री संतोष पा. कदम,ता.उपाध्यक्ष आत्माराम पा.कदम शहर मंत्री राजेश पा.बोडके राजेश पा. कुटे, कृष्णा पा.वानखेडे सदाशिव पा.कदम,कंटिराम पा.पवार, किरण पा.भालेराव, उद्धव पा.पवार,ज्ञानेश्वर भिसे,गजानन तांबोळे,बाबू पवार, संतोष शेंडगे, सोहन सिंह , गणराज केंद्रे अशोक राठोड़,चंद्रजीत यादव, निलेश गडम, योगेश कल्याणकर,अशोक तोनचिरे आकाश गव्हाणे शैलेश चंदेल,राम चींतोले,पवन गुणावत, ओमप्रकाश निळकंटे,संदिप निळकंटे सखाराम पा.तोंनचीरे.पांडुरंग, ज्ञानेश्वर,भागवत, पांडुरंग महाराज, रितेश, सुदर्शन,शुभम,सुनील, धनंजय, केंद्रे,व सर्व हिंदू प्रेमी आदींनी परिश्रम घेतले.