दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
छत्रपती संभाजीनगर येथील योगेश्वरी बोहरे हिने नुकतेच युरोप खंडातील पीक माउंट एलब्रस या शिखरावर यशस्वीरित्या गिर्यारोहण पूर्ण केले, आणि त्याचे तिला आज प्रमाणपत्र भेटले.
या अगोदर योगेश्वरीने दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजारो तसेच लिहा लडाख येथील पर्वतावर यशस्वीरित्या गिर्यारोहण केलेले आहे, तिची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे ती 3 ते 4 लाख रुपये खर्च उचलू शकत नव्हती, परंतु योगेश्वरीची चिकाटी आणि इच्छाशक्ती पाहून इप्का फाउंडेशन स्टारलाईट कंपनी, रूच्या कंपनीने आर्थिक मदत केली आणि आमदार संजय शिरसाट यांनी पूर्ण प्रवास खर्च करून भारताचा तिरंगा युरोप खंडातील पीक माउंट एलब्रस शिखरावर फडकवण्याचे योगेश्वरीचे स्वप्न पूर्ण करण्यास आर्थिक हातभार लावला.
योगेश्वरीने इप्का लॅबोरेटरीज लिमिटेडचे मानव संसाधन विभाग प्रमुख श्री. व्यंकट मैलापूरे यांची भेट घेऊन मागे केलेल्या मदतीबद्धल योगेश्वरिने आभार मानले.
योगेश्वरीला यापुढे सुद्धा जगातील उंच शिखर माउंट एवरेस्ट गिर्यारोहण करण्यासाठी जवळपास 35 ते 40 लाख रुपये खर्च लागणार असून त्यासाठी इप्का फाउंडेशनच्या माध्यमातून पुढील लागणाऱ्य खर्चास हातभार लावावे व समाजातील घटकांना मदतीसाठी आव्हान करावे अशी विनंती केली.
