
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: : देगलूर शहरातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या मनावर कार्यालयचे काम चालते राज्य सरकारने शासकीय
कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा केल्याने शासकीय कर्मचाऱ्यांना दोन दिवस विश्रांती मिळत आहे. परंतु असे असतानाही शहरासह तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील लेट लतीफ कर्मचाऱ्यांकडून वेळेचे बंधन पाळले जात नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामे खोळंबली आहेत.
काही कर्मचारी बाहेरगावी वास्तव्यास राहत असल्याने पाच दिवसांचा आठवडा झाल्यापासून शुक्रवारी दुपारीच कार्यालय सोडून घराकडे जाण्याची तयारी करतात. त्यानंतर शनिवार व रविवारची सुट्टी संपवून सोमवारी दुपारनंतरच उशिरा कार्यालयात हजर होतात. आणि कार्यालयात विचारले असल्यास वरिष्ठ अधिकारी कुठे गेले तर सांगतात मीटिंगसाठी बाहेरगावी गेले अशी उडवा उडवीची भाषा करतात जरी कर्मचारी कार्यालयामध्ये आल्यानंतर आधी वरिष्ठांच्या कामांना प्राधान्य देत शिल्लक राहिलेल्या कामाकडे वेळ देतात. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे मात्र खितपत पडतात.
त्यामुळे नागरिकांना आपल्या कामासाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असल्याचे दिसून येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, सामाजिक वनीकरण कार्यालय, वनपरिक्षेत्र कार्यालय, पंचायत समिती व तहसील कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय, तालुका कृषी तसेच गटशिक्षणाधिकारी कार्यालय, रजिस्ट्री कार्यालय, नगरपरिषद यांसह इतरही अनेक कार्यालयात हीचपरिस्थिती असल्याने एकाह
कार्यालयात शंभर टक्के सेवा हम कायद्याची अंमलबजावणी होत नाही व देगलूर शहरातील अनेक कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक मशीन इतिहासात जमा झाल्यासारखे दिसत आहे
यामुळे लोकप्रतिनिधींनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या विषयाकडे लक्ष घालून जनतेची कामे वेळेवर कशी पूर्ण होतील याकडे लक्ष दिले पाहिजे.