
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे .
मंठा तालुक्यातील सात सदस्य
संख्या असलेला तळेगाव ग्रामप- ‘चायत निवडणूक येत्या १८ डिसेंबर रोजी होत आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाकरिता 3 तर 7 सदस्य पदाकरिता 15उमेदवार रिंगणात आहे. सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने मतदारात उत्साह दिसून येत आहे.गावात बैठका चालू असून सर्व उमेदवार तटष्ठ भूमिकेत आश्वासनाची खैरात चालू आहे अनेक उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असल्याने ही निवडणूक चुरशीची ठरणार
आहे.मंठा तालुक्यातील तळेगाव ग्रामपंचायतमध्ये 3वार्डाचा समावेश आहे. 7सदस्य संख्या असलेल्या तळेगाव येथील 584 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी सरपंच पदाकरिता 3उमेदवार सदस्य पदाकरिता 15उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सरपंच पदाकरिता, रेणुका महादेव घुगे, दत्ता बळीराम चाटे,संदीप वामनराव चाटे.
■सदस्य पदासाठी 15उमेदवार रिंगणात.शकुंतला सदाशिव घुगे , चत्रभुज भगवान दराडे,छकुलाबाई बाबाराव केंद्रे , छकुलाबाई पिराजी सानप,संतोष बालासाहेब चाटे, संजिवनी दिलीप चाटे, ज्ञानदेव आनंदा चाटे,रामकिसन वामनराव चाटे,मुगाजी आत्माराम घुगे,चाटे चंद्रकला शंकर,चाटे पवन रोहिदास,दराडे भागुबाई, बळीराम,मुंढे मनकर्णा विश्व्नाथ, खंदारे गीता सिद्धेश्वर,घुगे संतोष विश्वभर.असे 15उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
काही स्वतंत्र उमेदवार तर काही पॅनलसह निवडणूक लढत आहे. तर सर्वच उमेदवार निवडून येण्यासाठी मतदारांची मनधरणा करीत असून पराकाष्टा करीत असल्याच दिसून येत आहे सोशीलमीडियावर आपला नेता लय पॉवरफुल्ल, आपला हक्काचं माणूस,एक जुटीने पेटलं राण प्रचार
करीत असल्याचे दिसून येत आहे. गाव पुढारी व कार्यकर्ते पॅनल प्रमुख आपापल्या उमेदवारांसाठी मतदारांच्या दारी जात आहेत.मतदानासाठी हात जोडत मागे केलेल्या पुढे करायच्या कार्याबाबतच्या लेखाजोखा मतदारांसमोर ठेवत आहेत. तसेच मतदारांच्या रोशाचा सामना करावा लागत आहे.सत्ताधारी उमेदवाराला मागे न झालेल्या कामाबद्दल बोललं जात आहे.नातेगोते, भावभावकीमुळे कोण बाजी मारेल हे चित्र अस्पष्ट असून निवडणूक तिरंगी असल्याने चुरस दिसून येत आहे सर्वच पॅनल प्रमुख सरपंच आपलाच असे सांगत आहे.