
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:-थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीचे औचित्य साधुन 22 डिसेंबर 2022 रोजी वैदिक गणित एक दिवसीय कार्यशाळा व पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर व मराठी विज्ञान परिषद उदगिर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सकाळी ९.३० वाजता कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या कॅप्टन डॉ. अनिता शिंदे व प्रमुख निमंत्रित तज्ज्ञ व्याख्याते प्रा. बी. बी. कुलकर्णी सहसचिव मराठवाडा मॅथेमॅटिकल सोसायटी, प्रा. डॉ. भालचंद्र करंडे सचिव मराठी विज्ञान परिषद शाखा उदगीर, प्रा. डॉ. सिध्देश्वर बेल्लाळे उपप्राचार्य दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूर, प्रा. डॉ प्रशांत वाघमारे उदयगिरी महाविद्यालय उदगीर, वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. शिवाजी शेळके व
उपप्राचार्य प्रा. प्रभाकर बाभुळगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उद्घाटनानंतर दिवसभर एकुण चार सत्रात तज्ज्ञ निमंत्रक प्राध्यापकांचे मार्गदर्शन झाले. वैदिक गणितामुळे गणित सोडविण्याची गती १० ते १५ पट जलद गतीने वाढते .तसेच विद्यार्थ्याचा आत्मविश्वास आणि एकाग्रताही वाढते व तर्कशक्तीचा विकास होण्यास मदत होते. या कार्यशाळेत कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. पोस्टर प्रदर्शन, व कार्यशाळेत सहभागी होण्या-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या विद्यार्थांना समारोप कार्यक्रमात रोख बक्षीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यशाळेत प्रा.डॉ. आर एम कदम वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख, प्रा.डॉ. अनिल कुमार जाधव रसायनशास्त्र विभाण प्रमुख, प्रा. डॉ. राजेश देसाई प्राणिशास्त्र विभाग प्रमुख, प्रा. डॉ. कमलाकर शिवलकर भौतिकशास्त्र विभागप्रमुख, प्रा.डॉ. सी.टी.लोंढे यांनी सक्रीय सहभाग घेतला. अध्यक्षीय समारोप प्राचार्या डॉ. अनिता शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विभाग प्रमुख प्रा. औदुंबर मुळे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा डॉ. सी. टी.लोंढे यांनी केले.