
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जोंधळे हे ३१ आक्टोबर२०२१ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यारोजीपासून प.स.चे कृषी अधिकारी वावळे यांना प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून चार्ज देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांनी काढले, आदेशानुसार वावळे हे प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून रुजू झाले.
पण मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड यांनी आर्थिक शिफारशीच्या जोरावर जेष्ठता वगळून प्रभारी गटविकास अधिकारी यांचा आदेश काढला अशी चर्चा लोहा तालुक्यात सर्वत्र चर्चिविली जात आहे.जेष्ठतेनुसार गटविकास अधिकारी यांच्या नंतर सहाय्यक गटविकास अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, शिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी नंतर प.स.चे कृषी अधिकारी येतात. पण आर्थिक शिफारशीच्या जोरावर जेष्ठता बाजूला सारत प.स.चे कृषी अधिकारी यांनी प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून आदेश आणून एक विक्रम केला आहे. पण यामागे हात कुणाचा कोणाच्या दबावाखाली हा आदेश देण्यात आला का यामागे मोठी आर्थिक देवाणघेवाण झाली असल्याची चर्चा लोहा तालुक्यात चालु आहे.
त्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी या पद्धावरुन पदोन्नतीने गटविकास अधिकारी म्हणून गोस्वामी यांचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या वतीने काढण्यात आले. गोस्वामी हे लोहा पंचायत समिती येथे हजर होऊन रुजू झाले. रुजू होताच जिल्हा परिषदला रजा देत फरार झाले आहेत. आज रोजीपर्यंत रुजू झाले नाहीत, जेष्ठता वगळून ठाण मांडून बसलेले गटविकास अधिकारी हे नवीन रुजू झालेल्या गटविकास अधिकारी चांगलीच दमछाक व पळवापळवी करत असल्याची चर्चा तालुक्यात जोरदार सुरु आहे. नवीन रुजू झालेल्या गटविकास अधिकाऱ्यांना प्रभारी गटविकास अधिकारी भारी पडत असल्याने वरिष्ठ या प्रकरणात काय कार्यवाही करतात याकडे तालुक्यासह जिल्हाचे लक्ष लागले आहे.