दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा- संभाजी पुरीगोसावी
बोरगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या बदलीनंतर बोरगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे अतिरिक्त पद रिक्त ठरत गेले. त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांची नियुक्ती करण्यांत आली होती. बुधवारी जिल्हा पोलीस दलात प्रभारी अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत झालेल्या बदलांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांना पदावरुन कार्यमुक्त करुन त्यांची सातारा शहर पोलीस ठाण्यांत बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीनंतर वाई पोलीस ठाण्याहून सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांची बोरगांव पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. रवींद्र तेलतुंबडे यांनी शुक्रवारी बोरगांव पोलीस ठाण्यांत हजर राहून आपला पदभार स्वीकारला. यावेळी बोरगांव पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांकडून त्यांचे स्वागत करण्यांत आले. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांचा वाई पोलीस ठाण्यांशी कार्यकाळ उत्कृंष्ट राहिला. तत्कालीन पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे व पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या समवेत त्यांनी वाई पोलीस ठाण्याचे कामकाज पाहिले. रवींद्र तेलतुंबडे वाई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि गुन्हे उघडकीस आणून सराईत आरोपीच्या मुसक्या आवळ्यांमध्ये श्री.तेलतुंबडे यशस्वी ठरले. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशावरुन बुधवारी उशिरा त्यांची बोरगांव पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. मावळते साहेब पोलीस निरीक्षक चेतन मछले यांचा कार्यकाळ बोरगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उत्कृंष्ट राहिला. बोरगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील अनेक गुन्हे उघडकीस आणले. त्यांनी यापूर्वी पुसेगांव बोरगांव अशा पोलीस ठाण्यात त्यांनी कामकाज पाहिले होते.


