दैनिक चालु वार्ता अहमद्पुर तालुका प्रतिनिधी -विष्णु मोहन पोले
चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर जयंती उत्सव समिती आयोजित चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त *यशवंतरत्न* राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे संपन्न झाला त्या पुरस्कार वितरण सोहळ्या मध्ये आदरणीय गणेशदादा हाके पाटील साहेब यांना शैक्षणिक क्षेत्रा मधील कार्यां साठी गौरव करण्यात आला.गणेश हाके यांनी समाजिक,राजकीय जीवनात अनेक चांगले काम केले आहेत.आपल्या कार्य कृत्यामुळे ते महाराष्ट्र भर युवकांसाठी आदर्शवादी स्थान आहेत संयमी स्वभाव आणी जास्तीत जास्त कार्य करून त्यांनी शैक्षेनिक क्षेत्रात गोरगरीबांच्या लेकरांना शिक्षण घेण्यासाठी संस्था निर्माण केल्या,अनेक विद्यार्थी घडवण्याचं कार्य त्यांचा शाळा ,कॉलेज यांच्या माध्यमातून झाल आहे .वाडी,तांडा,वस्ती,गाव येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्राहवात आणण्यात गणेश हाके यांचा खूप मोठा वाटा आहे.श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून प्राथमिक ते उच्च शिक्षण इथ पर्यंतच्या शिक्षणाच्या सुविधा त्यांच्या मार्फत दिल्या जातात याच कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना या वर्षीचा यशवंतरत्न हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . त्या प्रसंगी सावित्रीबाई फुले विद्यापीठ चे कुलगुरू ङाॅ. नितीनजी करमाळकर , चाणक्य मंङळा चे संस्थापक अविनाशजी धर्मधिकारी , ङाॅ यशपाल जी भिंगे, विवेकजी बिङगर,विठ्ठलजी जाधव ,ङाॅ अनिल जी दुधभाते,सौ.रुक्मिणी गलांङे उपस्थित होते.सर्व स्तरातुन् त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे


