दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:- शहरातील साहिल कॉम्प्लेक्स येथे दि १७ रोजी मंगळवार सर्वधर्मीय व सार्वजनिक शिव जन्मोत्सव सोहळा- २०२३ च्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकी दरम्यान “सर्वधर्मीय व सार्वजनिक शिव जन्मोत्सव सोहळा- २०२३” समिती गठीत करण्यात आली.यावेळी शहरातील सर्वधर्मीय शिव भक्तांच्या सहमतीने समितीच्या अध्यक्ष पदी अनिकेत आकरे,उपाध्यक्ष पदी धैर्यशील लोंढे यांची निवड करण्यात आली. यावेळी सचिव पदी रत्नदीप सरवदे,अतुल उपरे,रवी जाधव कोषाध्यक्ष पदी, अफ्ताब शेख,खजिनदार पदी ओंकार पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.शिव जन्मोत्सव समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.संयोगिताताई गाढवे व युवा नेते साहिल आप्पा गाढवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी शिवश्री विठ्ठल (आण्णा) बाराते, शाम वारे, अक्षय गाढवे यांच्यासह साहिल आप्पा गाढवे मित्र परिवार, विकास रत्न संजय गाढवे प्रतिष्ठान पदाधिकारी, मिञ परिवार, सदस्य,शहरातील सर्व मित्रपरिवार व मान्यवर,शिवभक्त उपस्थित होते.


