दैनिक चालू वार्ता राजगुरूनगर ता. प्रतिनिधी-मयुरी वाघमारे.
===================
राजगुरूनगर :- दिनांक 18 जानेवारी 2023 ता. खेड, जि. पुणे, कडूस या ठिकाणी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदाच्या निवडणूका पार पडल्या आहेत. पुरेसे संख्याबळ असूनही या ठिकाणी पराभूत झालेली असून राष्ट्रवादी चे अशोक गारगोटे यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे. या संस्थेचे अध्यक्ष पंडित नेहेरे यांनी काही दिवसांनपूर्वी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या अध्यक्षपदा साठी राजगुरूनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह या ठिकाणी पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी चे कडूस या गावचे अशोक गारगोटे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. कडूस सेवा सहकारी सोसायटी मध्ये तेरा संचालकांपैकी सात शिवसेनेचे व सहा राष्ट्रवादीचे संचालक आहेत तरीही राष्ट्रवादीचे अशोक गोरगोटे यांनी तर शिवसेनेचा वतीने राजेंद्र ढमाले आणि शंकर कावडे या संचालकानी अध्यक्ष पदासाठी
अर्ज भरले होते. कावडे यांचा अर्ज उशिरा भरण्यात आला त्या मुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अचानक उदभवलेल्या या परिस्थितीमुळे अंतिम निकाल घोषित आठ दिवस पुढे निवडणूक ढकलण्यात आली होती. परंतु अर्ज भरण्याची प्रक्रिया ही पूर्ण झाली असून त्या आधारे निकाल जाहीर करा अन्यथा आम्ही कार्यालय सोडणार नाही असे उपस्थित संचालकांनी सांगितले. या पेचात राजेंद्र ढमाले यांच्या दाखल केलेल्या अर्जावर स्वतः उमेदवार व अनुमोदकाची स्वाक्षरी नसल्याने तसेच कावडे यांच्या अर्ज उशिरा मुदत संपल्यावर दाखल केल्याने अध्यासी अधिकारी बगाटे यांनी ते दोन अर्ज रद्द केले. त्यामुळे राष्ट्रवादीचे गारगोटे यांच्या एकमात्र अर्ज वैध ठरल्याने त्यांची या ठिकाणी आधाक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकाऱ्यांनी घोषित केले. खेड तालुक्याचे आमदार श्री. दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली व उद्योजक प्रतापराव ढमाले, उद्योजक अभिजित शेंडे यांच्या शर्थीच्या प्रयत्नांने खंडित झालेली आधाक्षपदाची परंपरा कायम ठेवली गेली.


