दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी – शिवकुमार बिरादार
तेलंगणा राज्यातील शेतकऱ्याप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा पिक विमा बंद करून शेतकऱ्यांना तेलंगाना राज्य प्रमाणणे खरीप व रब्बी हंगामासाठी आर्थिक मदत द्यावी यासाठी शेतकरी पुत्र संघर्ष समितीतर्फे राज्याचे कृषिमंत्री माननीय नामदार अब्दुल सत्तार साहेब यांना भेटून निवेदन दिले यावर त्यांनी तात्काळ प्रधान सचिव कृषी यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले आहे
तसेच मुंबई मंञालय येथे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच ते सहा वेळा अतिवृष्टी होऊन पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने पिक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांनी युनायटेड इंडिया पिक विमा कंपनीकडे पूर्व सूचना दाखल न दाखल केल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे यासाठी तत्काळ पिक विमा कंपनीला काळ्या यादीत समाविष्ट करून सरसकट शेतकर्यांना नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चातच्या पिकविमा शेतकऱ्यांना देण्याची मागणी शेतकरी पुञ संर्घष समितीच्या वतीने करण्यात आली.
यावेळी शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे बालाजी पाटील सांगवीकर ,बालाजी पाटील औराळकर , रमाकात पाटील जाहूरकर उपस्थित होते


