दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
पेठवडज :- पेठवडज येथील बसस्थानक व ग्रामपंचायत कार्यालय परिसरात स्वच्छता ग्रह व मुतारीची सोय करून देण्याची मागणी श्री.कैलास गंगाधर शेटवाड माजी सरपंच पेठवडज यांनी विद्यमान सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.पेठवडज येथील ग्रामपंचायतीच्या मागील जागेवर महीलासाठी शौचालय व मुतारी बांधण्यात यावी तसेच ग्रामपंचायतीच्या दक्षिणेस मोकळ्या जागेत पुरुषांसाठी शौचालय व मुतारी बांधण्यात यावे अशी त्यांनी मागणी केली आहे.प्रवाशांची होणारी गैरसोय होऊ नये यासाठी सरपंचांनी आणि ग्रामविकास अधिकारी यांनी त्यासंबंधी लक्ष घालून बांधकाम करून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असे निवेदनात कैलास शेटवाड माजी सरपंच पेठवडज यांनी म्हटले आहे.


