दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी-गुरुनाथ तिरपणकर-
ना माझ्यासाठी ना तुझ्यासाठी आपला लढा रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग येथील समस्त कोकणवासियांसाठी.मागील १७दिवसांपासून मुंबई शहर,उपनगर व कोकणात चाललेली सही मोहीमने २५०००चा टप्पा पार पाडला आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या ढीसाळ कारभार विरोधात जनआक्रोश आता ज्वालामुखीत रुपांतर होत आहे. आपल्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच ०१.११.२०२२पासून एक मागणी लावून धरलेली आहे,शिमग्यापूर्वी महामार्ग पूर्ण करा अन्यथा कोकणकर महामार्गावर शिमगा करतील. आज अडीज महिने उलटले अजूनही टेंडर प्रक्रिया चालु आहे आणि हि टेंडर प्रक्रिया वर्षानुवर्षे अशीच चालत रहाणार परंतु प्रत्यक्षात महामार्गचे काम कधी चालु होणार हा प्रश्न समस्त कोकणवासियांना आहे. ४७१किलोमीटर रस्ता का होऊ शकत नाही. ७५किलोमीटर रस्ता ३दिवसात पूर्णं करु शकतात तर४७१किलोमीटर महामार्ग बनवायला एवढा वेळ का?सरकारने समृद्धी महामार्गाचे काम थांबवुन त्या ठिकाणी असलेली सर्व यंत्रणा कोकण महामार्गावर लावावी आणि या कोकणकरांचा १२वर्षे रखडलेला महामार्ग पूर्ण करावा अन्यथा हिंदू नववर्षाचे अवचित्य साधून कोकणकर शासन-प्रशासनाचे तेरावे घालून जनआक्रोशच्या माध्यमातून आपली एकजूट दाखवतील याची सरकारने दखल घ्यावी. कोकणवासियांवर होत असलेला महामार्ग रुपी अन्याय जर वर्षानुवर्षे असाच चालु राहिला तर शिमगा संपला,कोकणकरांची पालखी मिरवणूक संपली हे सर्व गुढीपाडव्याच्या शुभदिनी शेवट होतो आणि मग सुरूवात होईल ती जनआक्रोशाची.गुढीपाडव्यानंतर कोणत्याही क्षणी कोकणकरांचा जनआक्रोश रस्त्यावर दिसेल कारण जनआक्रोशाचे रुपांतर आता ज्वालामुखीत झालेल आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गार जनआक्रोश समिती पुढील लढ्यासाठी तयारीला लागलेली आहे.विविध संघटना,प्रत्येक गावाची मंडळ,ग्रामपंचायत मी कोकणकर म्हणून जबाबदारी स्विकारुन पाठींब्याकरिता व जनआक्रोश आंदोलनात सामील होण्यासाठी आवाहन करत आहे.तुम्ही सर्व कोकणवासियांनी विनंती करा आणि १२वर्षे रखडलेला महामार्ग २वर्षात नाही तर २महिन्यात पूर्ण करून घेण्यासाठी सरकारने आग्रह धरला पाहिजे,असे आवाहन मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचे सरचिटणीस श्री.रुपेच रामचंद्र दर्गे यांनी केले आहे.


