दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- आज पर्यंत जगाची काळजी ही बापानेच घेतलेली आहे. अहमदपूर येथे घेण्यात आलेल्या संत तुकाराम वारकरी संप्रदाय आणि पीबीएसपी आणि पुरोगामी साहित्य परिषद अहमदपूरच्या वतीने घेण्यात आलेल्या बाप या विषयावरील परिसंवादामध्ये ते बोलत होते पुढे ते म्हणाले की त्या त्या कालखंडामध्ये बापाने म्हणजेच वडिलांनी आपले कार्य चोखपणे पार पाडले आहे. महात्मा गौतम बुद्धाने सुद्धा आपल्या एकुलता एक मुलाच्या हाती भिक्षापात्र देऊन जगाच्या कल्याणासाठी बाहेर पाठवले. महान राजा अशोकाने सुद्धा आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना जगाच्या कल्याणासाठी ग्रह त्या करायला लावला.
जनतेची राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनतेला आपल्या मुलाप्रमाणे, कुटुंबाप्रमाणे सांभाळले आणि एका महान बापाचे कर्तव्य पार पाडले. अनेक जाती धर्मातल्या मावळ्यांच्या लेकरांची शिक्षणाची खाण्यापिण्याची काळजी छत्रपती शिवाजी महाराज घेत असत. संपूर्ण महाराष्ट्राची एक करता बाप होऊन त्यांनी काळजी घेतली.
अवेळीच अहिल्यादेवी होळकर विधवा झाल्या, समाजाने सांगितले सती जावं लागेल पण राजा मल्हारराव होळकर यांच्या मधला बाप जागृत झाला आणि त्यांनी सांगितले माझी सून सती जाणार नाही आणि त्यांनी बापाची भूमिका वटवली आणि अहिल्यादेवी ला समर्थपणे राज्यकारभार करण्याची मुभा दिली. जैविक बापा पेक्षा कर्तुत्वान बाप मोठा असतो हे महात्मा फुले मधल्या बापाने जगाला दाखवून दिले आणि एका ब्राह्मणाच्या मुलाला ओटीत घेऊन बापाची सर्व अधिकार पणाला लावून त्यांना समर्थपणे जगाची सेवा करण्याची संधी दिली.
छत्रपती शाहू राजाने दिनदुबळ्यांचे पालकत्व पत्करले आणि तमाम दीनदुबळ्यांचे बहुजन समाजाचे त्यांनी सर्वांगीण विकास केले.
तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या सुभाषिताप्रमाणे जे का रंजले गांजले तयाशी म्हणे जो आपुले साधू तोची ओळखावा आणि देव तेथेची जाणावा
याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम दीनदुबळ्यांची, बहुजनांची आयुष्यभर व केली केली आणि त्या महान बापाने त्यांना जगण्याचे अधिकार मिळवून दिले.
भारतरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मधलं पालकत्व जागृत झालं आणि त्यांनी इंग्रजाच्या भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या डफावर थाप मारून उभा महाराष्ट्र जागृत केलं आणि अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र उभा केला.
अशा प्रत्येक युगायुगामध्ये महापुरुष बाप म्हणून उभे राहिले आणि जगाचे कल्याण केले. आजही भारतीय समाज त्या बापाच्या शोधात आहे जो बाप समग्र जनतेची जातीय जनगणना करण्यासाठी पुढाकार घेईल कारण प्रत्येक जातीची जनगणना झाल्याशिवाय विमुक्त भटक्या जाती जमाती यांचा विकास होणारच नाही म्हणून समग्र जाती गणना झाली पाहिजे असेही ते पुढे म्हणाले.
परिसंवाद, कवी संमेलन आणि भजन संध्या या तिन्ही कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा गांधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर श्रीरंग खिल्लारे यांनी केले. साहित्य क्षेत्रातला मानाचा पुरस्कार कवी शिवा कराड यांना मिळाल्याबद्दल आणि आणि आपल्या पद्धतीने झाल्याबद्दल बालाजी शिंदे यांचे सत्कार शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
परिसंवादानंतर साडेसात वाजता प्राध्यापक संजीव कुमार भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाला सुरुवात झाली. त्या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन विद्रोही साहित्यिक आणि कवी राजेंद्र कांबळे यांनी केले त्यामध्ये अध्यक्ष प्राध्यापक संजीव कुमार भोसले शाहीर साबळे मुरारी कराड शिवा कराड रंजना गायकवाड समीयोदिन अहमदपूर वैजनाथ कांबळे शिवकांता शिंदे गणेश चव्हाण प्राध्यापक भगवान अमलापुरे प्राध्यापक आर के गजलवार कवयित्री मीनाताई तर शिवाजी नामपल्ली प्राचार्य तुकाराम हारगिले पत्रकार बाबासाहेब वाघमारे कवयित्री वर्षा माळी नामदेव राठोड विद्रोही कवी राजेंद्र कांबळे कवी संजय तिडके यांनी बाप या विषयावर कविता सादर करून जमलेल्या स्रो त्यांना भावविवश केले. प्राध्यापक द मा माने स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे पत्रकार बाबासाहेब वाघमारे, कलापुष्प प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भालेराव छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे विलास पडिले माधव तिगोटे ज्ञानोबा गायकवाड रावसाहेब वाघमारे तुकाराम आगलावे पाटील शिवाजीराव सूर्यवंशी आणि छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे सदस्य आणि प्रोगामी साहित्य परिषदेचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती
कवी संमेलनाचे सूत्रसंचालन विद्रोही साहित्यिक आणि कवी राजेंद्र कांबळे आणि कवयित्री वर्षा माळी यांनी केले तर आभार संजय महाराज नागपूरने यांनी मानले
कवी संमेलनानंतर सकाळी चार वाजेपर्यंत भजनामधून प्रबोधनाचे कार्य प्रोगामी विचारसरणीचे प्रबोधनकार संजय महाराज नागपूरने आणि त्यांच्या मंडळांनी केले


