दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा.रोज नवनवीन कंपन्याच आपल जाळं पसरवन काम चालु आहे. त्या मार्केटींग कंपन्यांची प्रचंड वर्दळ सुरु झाली असून अशा कंपन्या लाखो रुपये कमविण्याचे आमिष सुशिक्षित बेरोजगारांना दाखवून आपल्या जाळ्यात अडकविण्यचे प्रकार तालुक्यात घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी युवकांनी सावधान राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
अगोदर तालुक्यात पीअरलेस लाईफ -लाईन स्वदेशी के. बी.सी अशा अनेक कंपन्यांनी तालुक्यातील हजारो युवकांना आपल्या जाळ्यात अडकवून करोडो रुपये युवकांकडून घेऊन पसार झाले. त्यामुळे त्यावेळी अनेक युवक वैफल्यग्रस्त झाले होते.
आता नवनवीन कंपन्या सुशिक्षित बेरोजगारांना टार्गेट बनवून अनेक प्रकारची आमिषे दाखवून त्यांच्याकडून रक्कम उकळत असल्याचे दिसत आहे. अनेक कंपन्यांच्या मार्गदर्शकांनी बेरोजगार युवकांना सुरुवातीलाच तुम्ही महिन्याकाठी ३०-४० हजार रुपये मिळतील असे प्रथम आमिष दाखवितात. आपल्याच कुटूंबातील नातेवाईकांकडून व मित्रांकडून येथील सुशिक्षित बेरोजगार पैसे बचत करण्यासाठी चैन सर्कलच्या माध्यमातून पैशांची गुंतवणूक करण्याचे सांगतात. बँकेपेक्षा जास्त व्याज येणार या लालसेपोटी कुटूंबातील नातेवाईक सुध्दा बँकेमधील असलेली रक्कम काढून कंपनीमध्ये ती रक्कम गुंतवित असतात.


