दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
___________________________________
आज ‘ग्रंथालय शाळेच्या दारी’ या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मा.श्रीमती वर्षा घुगे (ठाकुर) मॕडम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिक्षणाधिकारी मा.श्री दिग्रसकर साहेब,प्र.जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री प्रताप सुर्यवंशी व इतर मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमातंर्गत कुसुमताई माध्यमिक शाळा सिडको,नांदेड या शाळेतील विद्यार्थ्यांना पु.अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक वाचनालय सिडको या वाचनालयाचे मोफत व शाळेतील शिक्षकांना सशुल्क सभासद करण्यात आले. यावेळी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे पुस्तके त्यांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली यावेळी वर्षा घुगे मॕडमने पु.अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक वाचनालय सिडको यांनी उपक्रमात सक्रीय सहभाग घेतल्याबदल वाचनालयाचे अध्यक्ष श्री गोविंद सुरनर यांचे कौतुक केले. व जिल्ह्यातील इतर सार्वजनिक वाचनालयाने देखील या उपक्रमामध्ये भाग घेऊन गावातील व परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांना निशुल्क सभासद करून घेऊन त्यांच्या आवडीची पुस्तके त्यांना उपलब्ध करून द्यावे असे आव्हान वर्षा घुगे मॅडम यांनी केले.



