दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा- सुरेश ज्ञा. दवणे
मंठा..येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल व विठ्ठल पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सव -2023 चे नायब तहसीलदार संजय शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या भव्य आणि निसर्गरम्य मैदानावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिनाची पूर्वतयारी म्हणून या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले, यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे मराठवाडा कार्याध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग खराबे पाटील तालुका उपकोषागार अधिकारी व्ही एन राजेंद्र नगरपंचायत चे लेखापाल अरुण शिंदे आयसीडीच्या संचालक एस एस भालेराव यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात विद्येचे दैवत सरस्वती मातेची पूजन करून करण्यात आली यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले क्रीडा महोत्सव दरम्यान कबड्डी खो-खो लांब उडी उंच उडी रनिंग लिंबू चमचा थाळी फेक भालाफेक लिंबू चमचा सह विविध खेळांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना नायब तहसीलदार संजय शिंदे यांनी शुभेच्छा देऊन जय पराजयाची तमाना बाळगता हमखास खेळत जा कठोर मेहनत करा परिश्रम करा निश्चितच यश मिळेल असा उपदेश केला कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य गोपाल जाधव दीपक मुरतोडकर दिपाली चिंचोलकर कमल अंभोरे सोनाली चिंचोलकर दिपाली कदम शिल्पा वाजे रंजना यादव वंदना कांबळे यासह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
क्रीडा स्पर्धा म्हणजे वेगळा आनंद… वार्षिक क्रीडा महोत्सव दरम्यान आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धा मध्ये सहभाग घेणे व त्या पाहणे हा मनाला मनमुराद आनंद देणारा उत्सव असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग खराबे पाटील यांनी व्यक्त केले


