दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी- शिवकुमार बिरादार
मुखेड येथील मातोश्री भीमाई व्याख्यानमाला संयोजन समितीच्यावतीने दि. २७ रोजी शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता बान्हाळी रस्त्यावरील कोत्तावार ऑईल मीलमध्ये ‘पसायदान’ या विषयावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत साहित्यिक कवी इंद्रजीत देशमुख (सातारा) हे मातोश्री भीमाई व्याख्यानमालेचे एकादशपूर्ती पुष्प गुंफणार आहेत.
कार्यक्रमाच्या
या अध्यक्षस्थानी शिवलिंग बादशहा बेटमोगरा मठ संस्थानचे प्रमुख सिध्द दयाळ शिवाचार्य महाराज हे रहाणार आहेत. याप्रसंगी जागतिक क्रीडा स्पर्धेत भारताचे नाव उज्वल करणारी प्यारा क्रीडा ऑलिम्पिक विजेती भाग्यश्री जाधव होंनवडजकर हिला गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार देऊन संयोजन समितीच्यावतीने गौरविण्यात येणार आहे.
मुखेड येथील सुप्रसिद्ध सर्पदंश चिकित्सक मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे यांनी गेल्या १० वर्षांपूर्वी आपल्या आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ मातोश्री भीमाई व्याख्यानमालेची सुरुवात केली. सामाजिक प्रबोधन व्हावे, ज्ञानाचा
प्रसार व्हावा, साहित्याची गोडी औषध असते’ या विषयावर निर्माण व्हावी. याउद्देशाने त्यांनी मुखेडमध्ये ही व्याख्यानमाला सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला.
गुंफले. आठवे पुष्प औरंगाबाद येथील जगन्नाथ दिक्षीत यांनी ‘विनासायास वेट लॉस’ या विषयावर गुंफले. नववे पुष्प नांदेड येथील डॉ. श्रीराम राठोड व महाराष्ट्र राज्याचे अपंग विभागाचे माजी आयुक्त आर. के. गायकवाड यांनी ‘विपश्यना परीचय व अनुभूती’ या विषयावर गुंफले तर १० वे पुष्प ‘जीवन ज्यांना कळले हो’ या विषयावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे (सातारा) यांनी गुंफले.
व्याख्यानमालेचे पहिले पुष्प मुंबई येथील प्रसिद्ध कवी प्रशांत मोरे यांनी ‘आई’ या विषयावर गुंफले. दुसरे पुष्प सातारा येथील प्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य यशवंत पाटणे यांनी सुंदर जगण्यासाठी या विषयावर गुंफले. तिसरे पुष्प सातारा येथील डॉ. राजेंद्र पवार यांनी सुजाण पालकत्व या विषयावर गुंफले, चौथे पुष्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुप्रसिद्ध वक्ते प्रा. तेज निवळीकर यांनी एकविसाव्या शतकासमोरील आव्हाने या विषयावर गुंफले. पाचवे पुष्प पुणे येथील संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा सुप्रसिद्ध वक्ते डॉ. रामचंद्र देखणे यांनी ‘ज्ञानदेवे रचिला पाया.. तुका झालासे कळस या विषयावर गुंफले आहेत. सहावे पुष्प जेष्ठ समाजसेवक तथा जीवनशैली व आरोग्य विषयाचे अभ्यासक अमरावती येथील डॉ. अविनाश सावजी यांनी ‘शतायुषी व्हा, पासवर्ड आरोग्याचा’ या विषयावर गुंफले. सातवे पुष्प ‘ताण-तणाव तथा नातेसंबंध समूपदेशक डॉ. सचिन देशमुख औरंगाबाद हे ‘स्वभावालाही
प्रत्येक पुष्पात समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका व्यक्तीचा दरवर्षी सन्मान करण्यात येतो. दि. २७ रोजी शुक्रवारी महाराष्ट्राचे प्रसिद्ध विचारवंत इंद्रजीत देशमुख हे ‘पसायदान’ या विषयावर एकादशकपुर्ती पुष्प गुंफणार
मुखेड तालुक्यातील रसिकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन


