
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (धारणी) :-धारणीच्या बसस्थानकाच्या आवारात आधीच स्वच्छतागृह बांधले आहे.मात्र,त्या स्वच्छतागृहाची अवस्था बऱ्यापैकी आहे.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्वच्छतागृहातून निघणारी घाण मुख्य रस्त्यावर पसरत आहे.बसस्थानकाच्या पाठीमागेच आठवडी बाजार आहे.मात्र,घाणीच्या दुर्गंधीमुळे येथे भाजीपाला व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे.याबाबत अनेक वेळा तक्रार करूनही उपयोग झाला नाही.प्रशासनाकडून या स्वच्छतागृहाची देखभाल केली जात नसून आता त्याच स्वच्छता गृहाजवळ सुमारे २० लाख रुपये खर्चून दुसरे स्वच्छतागृह तयार करण्यात येत आहे.याला म्हणतात,अंधेर नगरी चौपट राजा.
बसस्थानक परिसरात अगोदरच स्वच्छतागृह आहे.मात्र,त्याची योग्य देखभाल केली जात नाही.स्वच्छतागृहात अस्वच्छतेचा ढीग आहे.एवढेच नव्हे तर येथील घाण मुख्य रस्त्यावर वाहत असून संपूर्ण कॅम्पसमध्ये दुर्गंधी पसरत आहे.या बसस्थानकाच्या मागे शुक्रवारी आठवडी बाजार भरतो आणि या आवारात स्वच्छतागृहांची अस्वच्छता पसरते.त्यामुळे दुर्गंधीत बसून व्यवसाय करणे म्हणजे रोगराईला खुलेआम आमंत्रण देण्यासारखे आहे.
एकीकडे स्वच्छतागृहाची जबाबदारी पूर्णपणे हाताळली जात नाही,तर दुसरीकडे दुसऱ्या शौचालयाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात येत आहे.स्वच्छतागृहे तयार करणे आवश्यक आहे,जुन्या स्वच्छतागृहांची स्वच्छता व देखभाल योग्य प्रकारे करण्यात यावी,अशी मागणीही जनतेतून होत आहे.