
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा वर आपचे राजू कुडे यांनी पोलिस स्टेशन ला तक्रार दाखल केली
चंद्रपूर
चंद्रपूर: – संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राज्यामध्ये अनेक संत आणि महापुरुष होऊन गेले ज्यांनी समाजाला भक्ती आणि प्रेमाचे ज्ञान देत आपले संपुर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यामध्ये जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. राज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुध्दा तुकाराम महाराज यांना आपले गुरू मानले होते. अश्या संताना स्वयं घोषित बागेश्वर महाराज नावाचा भोंदू ने “तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारायची म्हणून ते देव देव करायचे” असे बेताल वक्तव्य करून राज्यातील अनेक अनुयायां सोबत कुणबी समाजाची धर्मीक भावना दुखावली गेली आहे. एवढे असून सुध्दा यावरती त्यांचा कडून माफी मागण्यात आलेली नाही आहे. यामुळे जनतेत रोष व्यक्त केले जात आहे.
आज आम आदमी पार्टी चंद्रपूर शहर सचिव तथा मनपा निवडणूक सहप्रभारी राजु भाऊ कुडे यांचा नेतृत्वात शहर पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि.कलम 298 अन्वये गुन्हा दाखल करणे सोबतच महाराष्ट्रातून तडिफार करून राज्यातील सर्व कार्यक्रम रद्द करण्याकरिता तक्रार करण्यात आली. जर यावरती कारवाई झाली नाहीं तर मोठया संख्येने रस्त्यांवर उतरू अशी भूमिका कुणबी युवा अध्यक्ष तथा आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे शहर सचिव राजू कुडे यांनी घेतली आहे. यावेळेस आपचे झोन संयोजक रहेमान खान पठाण, झोन सचिव सागर बोबडे, झोन सह संयोजक अजय बाथव, कृष्णा सहारे, अनुप तेलतुंबडे, भिमराज बागेसर, जयदेव देवगडे, शंकर कायरकर, कालिदास ओरके, कोमल कांबळे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थीत होते.