
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर प्रतिनिधी समर्थ दादाराव लोखंडे
जि.प.प्रा.शाळा भेंडेगाव येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करताना आयोजित विशेष कार्यक्रमात मिळालेल्या बक्षिसांतून अनिल कुमठेकर सरांच्या ‘ सुंदर हस्ताक्षर – हीच माझी ओळख ‘ या शुद्धलेखन हस्तपुस्तिकांचे वाटप सर्व विद्यार्थ्यांना गावाचे सरपंच श्री .राजू उदगिरे ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष – श्री. खुशाल कदम ,चेअरमन – श्री. संतोष कदम ,माजी सरपंच श्री. दिलीप कदम ,शिक्षणप्रेरक – राम उदगिरे ,शालेय व्यवस्थापण समितीतील शिक्षणप्रेमी सदस्य श्री .वीरभद्र मेदगे ,शाळेचे मुख्याध्यापक श्री.धनेगावकर सर ,शाळेतील शिक्षक श्री.तेलंग सर ,राठोड मॅडम ,बोधनकर मॅडम यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या शुद्धलेखन वह्यासाठी सरपंच राजू उदगिरे ,शा. व्य.स.अध्यक्ष – खुशाल कदम ,चेअरमन संतोष कदम ,मा. सरपंच – दिलीप कदम यांनी लाखमोलाचे सहकार्य केले .तसेच या शुद्धलेखन हस्तपुस्तिकेसाठी श्री.नागोराव जाधव सर (केंद्रप्रमुख – संकुल शेवडी ) यांचे विशेष सहकार्य लाभले .
सर्व दानशूर व्यक्तींचे तसेच श्री .नागोराव जाधव सरांचे विशेष आभार व्यक्त करून वह्या वितरनानंतर असेच सर्वांचे सहकार्य परत परत मिळावे व शाळेचा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावा ही सदिच्छा व्यक्त करून आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.