
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1952 मध्ये जन्मलेल्या श्री बलभीमराव पाचंगे सर यांचे जीवन जन्मताच खडतर वयाच्या चौथ्या वर्षी आईचे छत्र हरवले वडील तथा मोठ्या बहिणीने सांभाळ करत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले पुढे शिकण्याची जिद्द असताना परिस्थिती अभावी शिक्षण अपुरे राहते का ही मनामध्ये धास्ती घेऊन रविवारच्या बाजारामध्ये दिवसभर कांदे विकून जमलेल्या पैशातून शिक्षणाचे द्वारे स्वतः उघडणाऱ्या पाचंगे सरांनी आयुष्यामध्ये परत वळून पाहिले नाही 72 च्या दुष्काळामध्ये जेकेकूर तलाव, कोरेगाव तलाव अशा अनेक ठिकाणी जाऊन कामे करून तसेच रोपवाटिकेमध्ये जाऊन आपल्या कौशल्यातून विविध कार्य करून शिक्षण पूर्ण करणाऱ्या पाचंगे सरांनी आपल्या कुटुंबाची धुरा सांभाळली अनेक वेळा नोकरीची संधी आली असता परिस्थिती अभावी व जिम्मेदारी अभावी माघार घ्यावी लागली शेवटी वय संपण्याच्या काही महिने अगोदर नोकरी लागली व तेथूनच पाचंगे सरांचा दुसरा प्रवास सुरू झाला कोणतेही कार्य हाती घेतल्यास तन मनधनाने कार्य करणाऱ्या गुरुजींनी अनेक आदर्श विद्यार्थी घडवले काही वर्ष तुळजापूर प्रशाला येथे काम केल्यानंतर राहिलेली संपूर्ण सेवा स्वग्राम उमरगा येथे प्रशालेमध्ये संपूर्ण सेवा निवृत्तीपर्यंत कार्य केले पाचंगे सर म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक परंतु खो-खो ,कबड्डी ,मास पेटी ,स्काऊट गाईड ,प्रयोग दाखवणे बुलेटीन तासिकेवर गेल्यानंतर साक्षात इतिहास डोळ्यासमोर उभा करणे त्यातच स्वयंशिस्त लाभलेल्या पाचंगे सरांना विद्यार्थी तथा पालक घाबरत असत ते सतत म्हणत असत आपले आई-वडील काबाडकष्ट करतात त्यांच्या आयुष्याचं सोनं करायचं असेल तर शिक्षण चांगल्या पद्धतीने शिका अशी एक वरदहस्त तथा भावना रुपी व पालकाच्या भूमिकेतून कार्य करणाऱ्या वेळप्रसंगी हातामध्ये छडी घेऊन विद्यार्थ्यांना आपल्या परिस्थितीची जाणीव करून देणाऱ्या पाचंगे सरांनी आज वयाची 72 वर्षे पूर्ण केली ते म्हणतात मनुष्य जीवन म्हटले की जीवनामध्ये चढ उतार होत असतात अशा अनेक चढउतारांना सामोरे जाऊन आदर्श विद्यार्थी घडविणारे पाचंगे सर आजही जेव्हा माझे विद्यार्थी त्यांच्यासमोर येतात तेव्हा त्या विद्यार्थ्यांची नजर पूर्णतः खाली असते पाचंगे सरांचा शिक्षणाविषयीचा दबदबा कायमस्वरूपी टिकून आहे त्यांचे कौटुंबिक जीवन चांगले असून त्यांचे चिरंजीव श्री विक्रम पाचांगे हे त्यांच्या पावलावर पाऊल देत शिक्षण क्षेत्रात आदर्श शिक्षक म्हणून कार्य करत आहे तर दुसरीकडे मोठा मुलगा सामाजिक भान म्हणून हॉटेल व्यवसायामध्ये गेली 25 वर्ष चांगल्या प्रकारचा व्यवसाय सांभाळणाऱ्या व्यक्तिमत्व आणि मुलगी कळंब बाजार समितीमध्ये उपसचिव या पदावर कार्य करत आहे तसेच पत्नी व सुना आनंदाचे जीवन जगत आहेत नातू महाविद्यालयीन शिक्षण घेत व काहीजण व्यवसाय क्षेत्रात चांगल्या पदावर कार्य करत आहेत मोठा नातू विराज विक्रम पाचंगे याची सिकाई आर्ट या खेळ प्रकारांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. सुखी संसार व आदर्श कुटुंब चालवणारे पाचंगे सर यांना आजही फार मोठा समाजामध्ये मान आहे त्यांना भेटण्यासाठी त्यांचे माजी विद्यार्थी येत असतात यामध्ये डॉक्टर, तहसीलदार ,नायब तहसीलदार , मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक असे अनेक वेगवेगळ्या मोठ्या पदावर कार्य करणारी विद्यार्थी सुद्धा वर्षातून एक वेळेस त्यांना भेटण्यासाठी येतात व त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतात पाचंगे सर सतत म्हणत असतात जो आपली परिस्थिती जाणून चांगले राहण्याचा प्रयत्न करतो तो जीवनामध्ये कधीही अपयशी राहत नाही तो यशाची शिखरे गाठतो पाचंगे सरांनी अनेक गरीब विद्यार्थ्यांना सहकार्य केले आहे कितीही विद्यार्थी टार्गेट असेल तर त्यांच्यासमोर तो विद्यार्थी नम्रपणे वागण्याचा असा हातखंडा असणारे आगळे वेगळे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री बलभीमराव पाचंगे सर यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांचे भावी आयुष्य सुख समृद्धीने व भरभराटीचे जावे त्यांना आरोग्यमय जीवन लाभावे हीच सदिच्छा.
गुरुजींचा विदयार्थी सुधीर कांबळे
होळी येथे शिक्षक व बालभारती पुणे मंडळावर कार्यरत असून एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या कडे पहिले जाते त्यांनी हि सर यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांच्या विषयी खालील उद्दगार काढून आपल्या लाडक्या गुरुजीला वाढदिवसाच्या शुभेच्या व्यक्त केल्या.
शिस्त,प्रेम आणि अभ्यास याचा मिलाफ म्हणजे आदरणीय पाचंगे सर होय
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात जिजामाता मराठी माध्यमिक शाळा आगरवाडा चे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अंगद कांबळे या विद्यार्थ्यांनी आपल्या शिस्थ प्रिय खेळातील उत्कृष्ट मार्गदर्शक व वेळप्रसंगी रागावून मायेने जवळ घेऊन आपली परिस्थिती लक्ष्यात घ्या शिक्षण व्यवस्थित घ्या असे सांगणारे गुरुजींच्या वाढदिवसानिमित्याने त्यांना शुभेच्या देऊन त्यांना उत्तम असे आरोग्य लाभो अश्या मनोभावो शु
अनेक विद्यार्थी घडवणारे सर शतायुषी होवोत
शब्दांकन
आदर्श शिक्षक
श्री विक्रम पाचंगे सर
जि. प. शाळा. मानमोडी
ता.तुळजापूर