
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.. मंठा..तालुक्यातील पेवा (नळडोह) येथील दैवत श्री संत जनार्धन महाराज यात्रा उत्सवास सलाबादाप्रमाणे या वर्षी 05 फेब्रुवारीपासून धार्मिक वातावरणात सुरुवात होणार असून यात्रा 13फेब्रुवारी पर्यंत राहील यामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे
भंडारा रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ महाआरती – ११ ते १२ श्री.ह.भ.प. छगन महाराज टाकळीकर यांचे किर्तन दु. १२ ते2 दुपारी २ ते ५महाप्रसाद होईल.
सोमवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ सायं. ७ वाजता पालखी पेवा या गावातून वाजता गाजत प्रस्थान होईल व तसेच.
श्री.ह.भ.प. दत्ता महाराज राहेरीकर यांचे रात्री ८ वाजता खंजरी भजन होईल
मंगळवार दि. ७ फेब्रुवारी २०२३ सकाळी १० वाजता प्राक्षाळं पूजा होईल.
व परिसरातील भाविक भक्ततांनी कीर्तन श्रवणाचा महाप्रसाद लाभ घ्यावा व उपस्थिती राहून यात्रेची शोभा वाढवावी
अशी विनंती श्री संत जनार्धन महाराज संस्थांनच्या वतीने करण्यातआली आहे.