
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी –आकाश माने
श्री शिवछत्रपती सांस्कृतिक मंडळ संचलित जालना जिल्हा सर्वपक्षीय शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी युवा सामाजिक कार्यकर्ते अॅड. अर्जुन राऊत यांची कार्याध्यक्षपदी सुभाषचंद्र देविदान तर सचिवपदी अॅड. रवींद्र डुरे यांची निवड करण्यात आली आहे. रवींद्र राऊत यांच्या अध्यक्षतेखाली समिती निवडीसाठी बैठक घेण्यात . यावेळी एकनाथ गलधर,रामदास जाधव, रमेश देहेडकर, सतीश जाधव, अंकुश पाचफुले, तय्यब देशमुख ,खंडेश जाधव, किशोर बोबडे ,आकाश जगताप, विलास तिकांडे, अक्षय राऊत,प्रल्हाद खरात, शेख जहीर,आदर्श राऊत, आदींची उपस्थिती होती. आगामी शिवजन्मोत्सव साजरा करण्याबाबत चर्चा करून सर्वानुमते अध्यक्षपदी अॅड. अर्जुन राऊत, कार्याध्यक्ष सुभाषचंद्र देविदान तर सचिव पदी अॅड. रवींद्र डुरे यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारणीत कोषाध्यक्ष आकाश जगताप, उपाध्यक्ष अश्विन आंबेकर , ओम धोका, प्रसाद भुतडा, रवी अग्रवाल, आकाश देशमाने, स्वप्निल हिवराळे, रोहित भुरेवाल, सुनील पवार, शरद ढाकणे, गणेश चौधरी, चेतन नखलव, सहसचिव राहुल सुपारकर, आकाश खरे, अमित कुलकर्णी, सागर पोटपत्रेवार, देवेंद्र बुंदेले, विकी राजपूत, दिलीप जाधव, प्रणव जैस्वाल, रोहीत खोडवे, सोनू भालेराव, चेतन देसरडा, अॅड. रोहित बनवसकर, अॅड. विक्रांत देशपांडे, अॅड. शुभम भारूका, कर सल्लागार आकाश मुंदडा, यश जेथलिया, आदित्य बिर्ला यांचा समावेश असून नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.