
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-नवनाथ डिगोळे चाकुर
जे गाव करी ते राव काय करी या म्हणीप्रमाणे चाकुर – तळघाळ शिवरस्त्याशेजारील अंदाजे 100 शेतकऱ्यांनी एकत्र येवून 50 ते 60 वर्षापासून अतिक्रमण असलेला शिवरस्ता आज दिनांक 03/02/2023 रोजी महसूल प्रशासनाच्या सहकार्याने अतिक्रमणमुक्त केला.
तालुक्याचे तहसिलदार डॉ शिवानंद बिडवे यांच्याकडे चाकुर – तळघाळ शिवरस्त्याशेजारील शेतकऱ्यांनी शिवरस्ता मोकळा करून देण्यासाठी अर्ज केला होता, त्यानुसार तहसिलदार चाकुर यांनी मंडळ अधिकारी चाकुर श्री एन के गायकवाड, तलाठी चाकुर श्री अविनाश पवार, तलाठी तिवघाळ श्री संतोष स्वामी व उपअधीक्षक भूमी अभिलेख विभागाचे मोजणी सहाय्यक श्री प्रदीप गुरमे यांची नियुक्ती केली होती. उपरोक्त कर्मचारी यांनी गाव नकाशावरून शिवरस्त्याच्या मध्यभागाच्या खुणा करून दिल्या, त्यानुसार शेतकऱ्यांनी आपापसात सहमतीने 25 फुटाचा रस्त्या करण्याचे ठरवले आणि तत्काळ जेसीबी साठी आवश्यक खर्चासाठीचा निधी दोन्ही शिवारातील शेतकऱ्यांनी जमा करून अंदाजे 2.5 km चा शिवरस्ता अतिक्रमणमुक्त करून घेतला.
यासाठी उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी, नामदेव नवरखेले, राजेंद्र जणवाडे, माधव चाकूरकर, तिवटघाळचे उपसरपंच वैजनाथ पाटील, प्रकाश रेड्डी, लक्ष्मण पाटील, अमोल जनवाडे, सचिन चाकूरकर, भालचंद्र पाटील, रामचंद्र पाटील, शिवराज कांबळे, मोहन कांबळे, मारोती जनवाडे, शिवराज शेटे, रमाकांत पटने, सूर्यकांत पटने, भीमराव पटने आदी शेतकऱ्यानी पुढाकार घेतला.