
दैनिक चालु वार्ता रायगड / म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
” कृषि महोत्सव 2023″
म्हसळा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना तसेच महिला शेतकरी भगीनी मंडळी वर्गाला कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, दि ९ फेब्रुवारी ते दि. १३, फेब्रुवारी २०२३ चे दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अलिबाग अंतर्गत, कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रायगड आयोजित” कृषि महोत्सव” हा कार्यक्रम स्थळ-सेक्टर २७, सिडको मैदान, खानदेश्वर रेल्वे स्टेशन जवळ कामोठे, पनवेल. येथे आयोजित केलेला आहे. शेतकऱ्यांचे सेवार्थ ये -जा करणे करिता गाड्यांची निशुल्क सेवा कृषि विभागामार्फत,करण्यात आलेली आहे करीता सर्व शेतकरी बांधवांनी “कृषि महोत्सव” कार्यक्रमास उपस्थित राहून “कृषि महोत्सव वर्ष २०२३” चे कार्यक्रमाचा व मार्गदर्शनचा लाभ घ्यावा तसेच विविध प्रकारचे कृषि तंत्रज्ञानाबद्दल ची माहिती , कृषि तंत्रज्ञान परिसंवाद ,चर्चासत्रे, कृषि व कृषि संलग्न विभागांच्या योजनांचे माहितीचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे, “आवाहन तालुका कृषि अधिकारी”, म्हसळा. श्री. आर. ए. ढगारे यांनी केली आहे, तसेच अधिक माहितीकरिता तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा
श्री. आर ए ढगारे मो. नं. 75 88 96 18 74 / मो.न.91 30 81 85 96(श्री एस एन कुसळकर कृषि पर्यवेक्षक म्हसळा १ ,मो.न.8830179985, श्री, गणेश देवडे. प्रभारी कृषि पर्यवेक्षक म्हसळा २, मो.न.8788900394, श्रीमती कल्पना शेळके कृषि सहायक म्हसळा, मो.न.9834183463,
श्री धनंजय सरनाईक कृषि सहायक मो न. 8308742252)
श्री वाय. डी. महाले प्रभारी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक म्हसळा.