
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना आणि बदनापुर मतदार संघातील
३२६ गावासाठी ८०० ते १००० कोटीची वाॅटर ग्रीड योजना मंजुर काल झालेल्या बैठकीत मंजुर करण्यात आली असल्याची माहीती शिवसेनेचे माजीमंञी अर्जुनराव खोतकर यांनी आज एका पञकार परिषदेत दिली.
शहरातील दर्शना बंगला येथे आयोजित पञकार परिषदेत ही माहीती देण्यात आली असुन यावेळी बदनापुरचे भाजपा आ.नारायण कुचे,भास्कर दानवे पा,भाउसाहेब घूगे,पंडीतदादा भुतेकर,मोहन अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना खोतकर म्हणाले की जलजिवन मिशन योजना अंतर्गत ही योजना असुन जालना आणि बदनापुर साठी अशी ऐतिहासिक राहणार असुन हे दोन्ही मतदार संघ टॅकर मुक्त होणार आहे,शिवाय हे पाणी जायकवाडी धरणातुन घेण्यात येणार सर्वाना शुध्द पाण्याचा पुरवठा केल्या जाणार आहे.