
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी –
लोहा तालुक्यातील
पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकुल योजने अंतर्गत सन 2021 22 मध्ये लोहा तालुक्यातील 1850 गोरगरीब लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले या लाभार्थ्यांचे स्वतःच्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न वेळेत पूर्ण करण्यासाठी गटविकास अधिकारी व विभागप्रमुख यांनी लक्ष देऊन अनुदानाचे हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर वेळेवर जमा केल्यामुळे गोरगरीब लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळाला असून त्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे दिसून येत आहे
केंद्र सरकार कडून दरवर्षी प्रत्येक तालुक्याला प्रतीक्षा यादी नुसार घरकुलसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यात येत असते सन 2021 ते 2022 या वार्षिक वर्षात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लोहा तालुक्यात 1646 गरीब लाभार्थ्यांची निवड घरकुल योजनेत करण्यात आली तर रमाई घरकुल योजनेत 204 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले एकूण 1850 लाभार्थ्यांना घरकुल योजना मंजूर करण्यात येऊन त्यांना योजनेचा लाभ मुदतीत उपलब्ध करून देण्यासाठी गटविकास अधिकारी वावळे व विभागाचे डेटा आपरेटर दिनेश तेलंग यांनी ग्रामसेवक ,रोजगरसेवक अभियंते यांची बैठक घेऊन लाभार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्थाव कार्यालयात सादर करण्याच्या सूचना दिल्या यावरून तालुक्यातील 1850 लाभार्थ्यांचे परिपूर्ण घरकुलाचे प्रस्थाव कार्यालयात सादर झाल्याने लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करण्यासाठी आर्थिक अडचण येऊ नये म्हणून गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थ्यांना वेळेवर पहिला दुसरा तिसरा तर काही लाभार्थ्यांना चौथा ही अनुदानाचा हप्ता वितरित करण्यात आला असल्याने गोरगरीब लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे
सन 2018 ते 2021 या कालावधीत मंजूर झालेल्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना अनुदानाचे हप्ते मिळण्यास विलंब झाला वेळेवर अनुदानाचे हप्ते खात्यावर जमा होत नसल्याने अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम अर्धवट सोडून दिले त्यांचे घरकुलाचे स्वप्न अधुरे राहिले परंतु सन 2022 मध्ये रखडलेल्या अनुदानाचे हप्ते व नवीन घरकुलाच्या अनुदानाचे हप्ते वेळेवर मिळत असल्याने घरकुल बांधकामात गती मिळाली आहे यामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे