
दैनिक चालु वार्ता सावरगाव सर्कल प्रतिनिधी- राम पाटील क्षीरसागर
लोहा तालुक्यातील आडगाव येथे श्री संत मोतीराम महाराज नेम व छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये भागवताचार्य हरिभक्त पारायण दत्ता महाराज झाडे मुरुंबेकर यांच्या सुमधुर वाणीतुन भागवत कथा होणार आहे
दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रविवार रोजी या कथेला प्रारंभ होणार आहे पहाटे ४ ते ६ काकड आरती सकाळी १० ते १२ गाथा भजन दुपारी१ ते ४श्रीमद् भागवत कथा व रात्री ९ते ११ हरिकीर्तन होणार आहे यामध्ये श्री हरिभक्त पारायण दत्ता महाराज झाडे मुरंबेकर, ह भ प मारोतराव महाराज हिपरगेकर, ह भ प राम महाराज खोरसकर, ह भ प सोमनाथ महाराज बदाले, ह भ प शंकर महाराज लोंढे सोन मांजरीकर ह भ प गुरुराज महाराज देगलूरकर, ह भ प कृष्णा महाराज राऊत गेवराई कर , ह भ प माऊली महाराज सिंदगीकर यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमास विशेष उपस्थिती गावचे भुमीपुत्र जिल्हा भूषण शास्त्रीय गायक नागेश आडगावकर यांची राहणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती समस्त गावकरी मंडळी आडगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे