
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी- इस्माईल महेबूब शेख
==========================
निलंगा : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कर्मयोगी डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा निलंगा येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, शिवराज पाटील चाकूरकर साहेब, महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि जयंत पाटील तसेच रावसाहेव दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व पक्षीय कार्यकते आजी माजी जिल्हा परिषदचे अधेक्ष सदस्य , पंचायत समितीचे अधेक्ष सदस्य, तसेच जिल्ह्यातील सर्व जिल्हा आणि तालुका कमिटीचे अधेक्ष, सदस्य आणि राज्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व प्रेमी जनता या अनावरण सोहळ्यास उपस्थित राहणार आहे.