
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलुर/प्रतीनीधी
दि.०५ फेब्रुवारी २०२३ रविवार रोजी सकाळी ११.०० वा.स्थळ भक्ती लॉन्स मालेगाव रोड, नांदेड या ठिकाणी होणार आहे. हा वधु-वर परिचय मेळाव्यात जंगम समाज हजारोच्या संख्येनी बांधव व भगिनी उपस्थित रहावे,
जंगम समाजातील वधु-वरांचे विवाह सहजरीत्या जुळावेत व स्थळांची मेळावा व पुस्तकाच्या माध्यमातुन माहिती मिळावी हा मेळाव्या मागचा प्रमुख उद्देश आहे.
वधु-वर परिचय मेळावा ही काळाजी गरज असून या मेळाव्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक आंध्रप्रदेश इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात वधु-वर आपला परिचय देण्यासाठी येणार आहेत तरी नोंदणी करण्यासाठी वधु-वरांचा पासपोर्ट साईज फोटो व जन्म तारखेचा दाखला अत्यंत आवश्यक आहे. गेली १४ वर्षापासून नांदेड येथे वधु-वर परिचय मेळावा होत असतो. या मेळाव्यातून असंख्य वधु-वरांचे विवाह जुळलेले आहेत. काही मेळाव्यात तर त्याच ठिकाणी सोयरीकीसुध्दा झालेल्या आहेत.
वधु-वर परिचय पुस्तिकेतुन असंख्य वधु-वरांचे बायोडाटा (परिचय पत्र) मेळाव्याच्या रुपातुन जंगम समाजाला या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी उपलब्ध करुन दिलेले आहेत. समाजातील काही बरेचसे मंडळी आपण भले ते आपले काम भले अस वागत असतात त्यांच्या मुला-मुलींच्या सोयरीक सुध्दा होण अवघड होऊन बसलेले
आहे. परंतु राज्यस्तरीय जंगम समाज संघटनेने मेळावे घेऊन परिचय पुस्तीका समाजाता देऊन उत्कृष्ट कार्य केलेले आहे, त्याच्या या सहकार्यामुळे पुस्तकातील नोंदी पाहुन त्याचा अभ्यास करून असंख्य वधु-वरांच्या सोयरीक जुळलेल्या आहेत.
“जंगम समाज संघटना मजबुत करण्यासाठी समाजाचे प्रबोधन करण्याचे काम व समाज जागृत करण्याचे काम सर्वश्री अध्यक्ष किशोर स्वामी, उपाध्यक्ष डॉ शंकर स्वामी वहेपुरीकर, सचिव गजानन स्वामी पाथरडकर, कोषाध्यक्ष दिगांबर स्वामी कुरुंदकर, कार्याध्यक्ष नागनाथ स्वामी वसमतनगर, गंगाधर स्वामी काटकर स्वामी पटवेकर, रंगनाथ स्वामी वसमतकर, विश्वनाथ स्वामी रोशनगांवकर शिवकुमार हिरेमठ मुखेडकर, शिवलिंग स्वामी कामठेकर, सारंग स्वामी बारहकर पंकज स्वामी लहानकर, विरभद्र बेंडके स्वामी वसमतकर परिश्रम करीत आहेत. तरी समाज बांधव बंधू-भगिनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून हा मेळावा स्वीकारावा अशी विनंती केली आहे .