
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी – माधव गोटमवाड
कंधार – ग्रामपंचायत कार्यालय दगड सांगवी व जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दत्तात्रेय महाराज यांच्या यात्रेनिमित्त गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आले.
दत्तात्रय महाराज मंदिरापासून ते दगडसांगवी नगरीत सर्व रस्ते नदीपर्यंत स्वच्छ करण्यात आले. या अभियानामध्ये ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य ग्रामसेवक गावातील नागरिक व जनता माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी प्राचार्य शिक्षक सहभागी होते.
स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन दगडसांगवी नगरीचे सरपंच प्रदीप बालासाहेब पाटील फाजगे, कदमवाडी चे सरपंच प्रतिनिधी प्रकाश कदम माजी सरपंच दिगंबर कदम, ग्रामपंचायत सदस्य माधव ढवळे,मा..स रामा देवकाते,सोमाजी ढवळे व दगड सांगलीचे ग्राम विस्तार अधिकारी कठारे साहेब व जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मोहन फाजगे सहशिक्षक शिंदे श्रीराम फाजगे, कोंडीबा फाजगे अरुण पाटील, शहाजी फाजगे, चक्रधर फाजगे, रामकिशन खपराळे, यांच्या हस्ते झाले
याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी कठारे साहेब
यांनी गावकऱ्यांना स्वच्छ तेच महत्व सांगुन
गावकऱ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी
सर्वांनी स्वच्छतेचा वसा घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.