
दैनिक चालु वार्ता पुणे/प्रतिनिधी:- दि.५ फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार संघ व लेवा संगिनी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक सर्वसाधारण सभा व स्नेहसंमेलन मेळ्यावाचे आयोजित करण्यात आले होते. प्रसंगी वराडे टुल्स चे मॅनेजिंग डायरेक्टर लिलाधर वराडे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तसेच लेवा पाटीदार संघाचे सचिव गजानन लोखंडे यांनी वार्षिक जमाखर्च सादर केला. तसेच पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार संघाचे अध्यक्ष निनाभाऊ खर्चे यांनी आपल्या मनोगतात संघाची ध्येय धोरणे काय आहेत याबद्दल माहिती दिली. आळंदी या ठिकाणी आपल्या संघाच्या मालकीची 9 गुंठे जमीन आहे. या जागेवर बांधकाम करून एखादा हॉल उभारला तर आपल्या समाजातील लोकांची गरज भागेल. वेगवेगळे समारंभ व लग्नकार्य कमी खर्चात आयोजित करता येतील. व संघाला एक उत्पन्नाचे साधनही होईल या सभेमध्ये उपस्थित मान्यवरांचा एक झाड देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी शिक्षणाधिकारी माननीय ज्ञानेश्वर पाटील यांनी आपल्या मनोगतात संघाच्या भरभराटीसाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन काम करावे व तन-मन-धनाने संघाला सहकार्य करावे असे विचार मांडले. लेवा संगिनी मंच च्या अध्यक्षा सौ.किरणताई पाचपांडे यांना डॉक्टर मनीभाई देसाई ट्रस्ट च्या वतीने डॉ. रवींद्र भोळे यांच्या शुभहस्ते सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रविंद्र भोळे यांनी आपल्या आध्यात्मिक विचारातून निष्काम कर्मयोग म्हणून काम करा अशा लोकांची गरज समाजाला आहे. त्यांच्याच हातुन मोठमोठी कामे होऊ शकतात. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष लिलाधर वराडे यांनी आपल्या मनोगतात सर्व सभासद बंधुभगिनी यांनी एकत्र येऊन मंडळाला आर्थिक मदत करावी असे आवाहन केले. याप्रसंगी किरणताई पाचपांडे यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला मिलिंद चौधरी, अमोल पाटील, नारायण खर्चे, दिपक पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय इंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव गजानन लोखंडे यांनी केले. यानंतर उपस्थित महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व शेवटी टिव्ही कलाकार चिन्मय पाचपांडे, व अंशुल बोंडे यांनी समाजावर एक नाटिका सादर केली. व कार्यक्रमाची सांगता झाली.