
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता,प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर: – अवघ्या एका वर्षात विज्ञान प्रदर्शनात राज्य स्तरापर्यंत धडक, क्रीडा स्पर्धेत तालुका,जिल्हा, विभागीय स्तरापर्यंत धडक तसेच तालूकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन एवढेच नव्हे तर शाळेत प्रत्येक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यात विविध विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या जवाबदा-यांची जाणीव करून देणे हे काम म्हणावे तेवढे सोपे नाही पण सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून ही सर्व कामे यशस्वी रीतीने होत असून या शाळेचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे असे प्रतिपादन खासदार सुधाकरराव शृंगारे यांनी केले. ते रुद्धा अहमदपूर येथील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आयोजित केलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील हे होते तर व्यासपीठावर माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव,माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील,माजी आमदार बब्रुवान खंदाडे, किसान मोर्चाचे सचिव दिलीपराव देशमुख,माजी सभापती ॲड भारत चामे, क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन जीवन मद्देवाड,माजी उपसभापती बालासाहेब गुट्टे, रुद्धाचे सरपंच गजानन चंदेवाड, उपसरपंच नाथराव केंद्रे, भाजपाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्राचार्या रेखाताई हाके,अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पठाण बबलु सर, भाजपाचे तालुकाध्यक्ष हाणमंत देवकते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा दत्ता गलाले, अहमदपूर येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ अतुल खडके,सिनेट सदस्य ॲड निखिल कासनाळे,प्रा मारोती बुद्रुक पाटील , विस्तार अधिकारी बालाजीराव शिंदे, पंचायत समितीचे विज्ञान विषय प्रमुख ज्ञानोबा सुकरे, सुरेश हाके,बाजीराव खडके, गणेश हामणे,जमालपुरे, कुलदीप हाके,शिवालिका हाके यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव म्हणाले की, अल्पावधीतच नावारूपास आलेली सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल हे आपलं अभिमान आहे कुलदीप हाके यांचे प्रास्ताविक हे एका मुरब्बी शिक्षणतज्ञ्यासारखं होतं हेच यशाचं सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलचे गमक आहे.
दिलीपराव देशमुख म्हणाले की अशा कार्यक्रमांतूनच उद्याचे सशक्त तथा परिपूर्ण नागरिक घडतात.आणि या शाळेत नेहमीच कार्यक्रम आयोजित करण्यात येतात म्हणजेच अभ्यासासोबत इतरही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात हे निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे.तर जीवन मद्देवाड म्हणाले ग्रामीण भागात इंग्रजी शाळा चालवणं जिकरीचे असतानाही या ठिकाणी शाळा काढून ती यशस्वी पद्धतीने चालू आहे आणि तेही गुणवत्तापूर्ण.माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना विद्यार्थी व शिक्षकांना त्यांच्या कामाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलदीप हाके यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांगळे संभाजी आणि परमेश्वर पाटील यांनी केले तर आभार प्राचार्या रूथ चक्रनारायण यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिना कल्लूरकर,अंजली बोधनकर,स्नेहा ओझा,ज्योत्सना स्वामी,ॠत्विक पोले,आयुषी पोले,शेख मोसीन,भरत कानवटे, शुभांगी सूर्यवंशी,केशव तोंडारे,चंदा काडवादे,सुभद्रा महाजन,अंगद सुरनर,राणी सुरनर आदींनी परिश्रम घेतले.