
दैनिक चालु वार्ता मोताळा प्रतिनिधी:- तालुक्यातील तळणी येथे जागर फाऊंडेशन तर्फे दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. यामध्ये मलकापूर परिसरातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम व अपघात होण्यास कारणीभूत वारंवार होणाऱ्या चुका कोणत्या व त्या कश्या टाळाव्यात याबद्दल माहिती देण्यात आली. याबद्दल चे पत्रक मुलांना देऊन नंतर त्यावर मुलांची परीक्षा घेण्यात आली. यावर्षी यासोबतच आम्ही मुलांना पर्यावरण संवर्धनासाठी इकॉब्रिकस चा वापर याबाबतही प्रात्यक्षिक दाखवून माहिती देत आहोत व याबाबतचीही पत्रके मुलांना वाटत आहोत जेणेकरून ही संकल्पना प्रत्येक घरापर्यंत पोहचेल. या उपक्रमाअंतर्गत दि.९ फेब्रुवारी रोजी जनता हायस्कूल, तळणी येथे डॉ.नितीन बऱ्हाटे यांनी इकॉब्रिकस व रस्ता सुरक्षा संदर्भात माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. निसर्ग संरक्षण आणि संवर्धनासाठी शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा म्हणून जागर फाऊंडेशनचे सचिव श्री.विजय राणे सर यांनी किमान पाच इकॉब्रिकस तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना जागर फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरण संवर्धन कार्यात सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र मिळणार असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे संचालक अमित नाफडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून इकॉब्रिकस बनवण्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळी मुख्याध्यापक वामन सुरळकर सर, विजय लेनेकर सर, प्रेमचंद देशमुख, प्रदीप नाफडे, देवराम काकडे, सौ.सिमा प्रदीप नाफडे मॅडम, गजानन सोळंके, जागर फाऊंडेशनचे सदस्य मिलींद भारंबे सर व यांच्यासह जनता हायस्कूल व जनता कॉन्व्हेंटचे शिक्षकवृंद कर्मचारी बांधव यांचे सहकार्य लाभले. त्याबद्दल जागर फाऊंडेशने सर्वांचे मनापासून आभारी मानले.