
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी /गंगाखेड : मागील अनेक वर्षे निधीअभावी प्रलंबित असलेला गंगाखेड–किनगाव रस्त्याचा प्रश्न साध्य करतांना आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी जी महत्वपूर्ण खेळी खेळून जनहिताचे काम सार्थकी लावले, त्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी तब्बल १८५ कोटींचा फंड देऊन झळाळी देण्याचे काम मार्गी लावले, धन्य ते दोन्ही नेते, जे जनतेच्या कामी आले, असं म्हटलं तर मुळीच वावगे ठरणार नाही.
राज्यात भाजपाची सत्तेत भागीदारी तर देशात पूर्णपणे वफादारी. नितीन गडकरींच्या प्रयत्नांने देशभरातील रस्त्यांना मिळतेय उभारी, तर युवा उद्योजकाच्या सहकार्याने आ.गुट्टे यांनी साधलाय गेम भारी. असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.
राष्ट्रीय महामार्ग क्र.७५२ लगतचा गंगाखेड-किनगाव दरम्यानचा रस्ता विकास कामांसाठी मागील अनेक कालावधी पासून निधी अभावी तसाच पडून राहिला होता. त्या भागाचे पालकत्व डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्याकडे आमदार या नात्याने बांधिल होते. रस्त्याचे क्षेत्रफळ तसे २७ कि.मी.एवढे होते. परंतु विकास कामांसाठी खर्चाचा आकडा सुध्दा न देणारा असाच होता. परिणामी एका बाजूला निधीची चणचण तर दुसरीकडे नागरिकांचे झाले उदास मन. निवडणूक आली तोंडावर अन् लोकांचा कल येरझाऱ्यांवर. एका पेक्षा एक अडचणींचा डोंगर पोखरुन मार्ग कसा काढायचा याचा ताळेबंद रचतांना युवा उद्योजकाच्या सहकार्याने, डोकं चालविले डॉ. गुट्टे साहेबांने. डोकं चालवून गडकरींवर टाकला फास अन् गंगाखेड-किनगाव रस्त्याचा साधला विकास.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशभरातील गावखेडे आणि शहरी भागांतील रस्त्यांचं जाळ विणून त्याला झळाळी देण्याचे महत्प्रयासी काम दळणवळण मंत्री म्हणून नितीन गडकरी हे कुशलता व गती मानता या प्रणालीच्या अनुषंगाने पार पाडीत आहेत. त्यात महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष असला तरी लोकप्रतिनिधी म्हणून भाजपाच्याच संगतीनेच कार्याचा वसा घेतलेल्या डॉ. गुट्टे यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळकीतून थेट गडकरी यांचेशी संधान साधण्याची लोकाभिमुख चाल खेळून आमदार या नात्याने जे लोकहित साधले, ते खरोखरच स्तूत्य असेच म्हणावे लागेल.
अंगी असलेली नागरी विकास कामांची जिद्द, प्रयत्नांची पराकाष्ठा, लोकहिताची व्यासंगी चळवळ आणि मत आणि मतदारांशी व त्यांच्या विकासाप्रति असलेला जिव्हाळा यांचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आ.रत्नाकर गुट्टे हे एकमेव आहेत. ‘मतदारांचा विकास हाच खरा ध्यास’ हे जोपासणाऱ्या आ. गुट्टे यांची मतदारांशी असलेली बांधिलकी व तळमळ ओळखून केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी यांनी लगेच ताडले नि सुमारे १८५ कोटींच्या निधीचे पत्र तात्काळ काढून अंदाज पत्रकाचे सत्वर निर्देश दिले. उभय दोन्ही लोकप्रतिनिधी भोगी नसून लोकांच्या सदैव उपयोगी पडणारेच असल्याचे यावरुन पूर्णपणे सिद्ध झाले आहे. त्यामुळे च गंगाखेड-इसाद, इसाद-सुपा, किनगाव मार्गे पिंपळदरी फाटा आणि पिंपळदरी-किनगाव असा एकूण २७ कि.मी.चा नागरी विकास साधण्याची किमया अखेर मार्गी लागल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे एवढे नक्की.