
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/हिंगोली : कॉंग्रेस नेत्या तथा हिंगोली येथील विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर एका अज्ञात इसमाने भ्याड हल्ला झाल्याची खळबळजनक माहिती दस्तूरखुद्द प्रज्ञा सातव यांनीच स्वतः ट्विट करुन दिली आहे.
कॉंग्रेसचे दिवंगत नेते तथा माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी तथा विधान परिषद सदस्या प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोलीत हल्ला झाल्याची माहिती पुढे आली आहे. या अत्यंत खळबळजनक अशा बातमीमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आमदार प्रज्ञा सातव यांनी स्वतः याबाबतीत ट्विट करुन आपल्यावर हल्ला झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, माझ्यावर झालेला हा हल्ला पूर्वनियोजित असाच होता असं त्यांनी सांगितलं आहे. मी कोणाचही वाईट केलेलं नसून महिला आमदारावर करण्यात आलेला हा हल्ला म्हणजे लोकशाहीवर झालेला दुर्दैवी घाला होय. माझ्या जीवाला धोका असला तरी मी माझ्या लोकांसाठी काम करतच राहीन, कारण राजीव भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई, इंदिराजी यांच्यासारख्या थोर महिलांवरही यापूर्वी हल्ले झालेले आहेत. मात्र, त्यांनी घरी न बसता आपले काम सुरुच ठेवले होते. माझ्यावर झालेला हा हल्ला हा पूर्वनियोजित असाच होता , असेही आ. सातव यांनी आपल्या ट्विटर मध्ये म्हटलं आहे.
कोण आहेत, प्रज्ञा सातव
“””””””””””””””””””””””””””””””””
दिवंगत कॉंग्रेस नेते राजीव सातव यांच्या प्रज्ञा सातव ह्या पत्नी आहेत. तसेच त्या विधान परिषदेतील कॉंग्रेसच्या आमदार पण आहेत. राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची राज्यसभेवर वर्णी लागली जाईल अशी मोठ्या प्रमाणात चर्चाही रंगली होती मात्र, पक्षानं त्यांच्या ऐवजी रजनी पाटील यांना राज्यसभेवर पाठवलं आणि प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली.
कॉंग्रेसचे नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लावत त्यांना सर्वपक्षीय अनुमतीने बिनविरोध निवडूनही आणले गेले. महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर रणांगणातील प्रज्ञा सातव यांना भाजपाने ही पाठिंबा देत आपल्या अधिकृत उमेदवाराला अर्ज मागे घेण्याचे सूचित केले होते.
दरम्यान, आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे कॉंग्रेस सह अन्य सर्वंच पक्षांमध्ये प्रचंड खळबळ माजली असून कमालीची चिंताही व्यक्त केली जाणे स्वाभाविक आहे. तथापि आ. सातव यांच्यावर ज्या कोणी हा भ्याड हल्ला केला आहे, त्यांच्या मागणी कारणमिमांसा ती नेमकी काय असावी, हे तपासा अंतीच समोर येऊ शकेल. त्यांची कोणतीही पार्श्वभूमी गांभीर्य पूर्वक असल्याचे सद्यस्थितीत दिसून येत नसले किंवा ज्ञात नसले तरी झालेला प्रकार मात्र चिंताजनक असाच आहे. या हल्ल्यामुळे त्यांच्या त्या लहान लहान मुलांवर काय प्रसंग ओढवला असेल याचाही विचार करणे अशक्यप्राय झाले असावे.
.