
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- दीपक कटकोजवार
अखिल भारतीय काँग्रेस चे राष्ट्रीय नेते खासदार श्री.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबर २०२२ ला कन्याकुमारी येथुन निघालेल्या भारत जोडो यात्रेत चंद्रपूर काॅंग्रेसच्या युवानेत्री प्रेरणा सुभाषसिंह गौर सहभागी झाल्या होत्या.हि यात्रा ४०८० कि.मी चे अंतर १४० दिवसात पार करुन श्रीनगर-जम्मु काश्मीरात पोहचली.यावेळी यात्रेत भारतातील पंजाब, तामिळनाडू,केरळ,मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश तथा जम्मू काश्मीरातील हजारों काॅंग्रेसजन सहभागी झाले होते.. या भारतजोडो यात्रेत सहभागी प्रेरणा , महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसचे प्रतिनिधी व जेष्ठ नेते श्री.सुभाषसिंह गौर यांच्या सुपुत्री आहेत…आज सकाळी ११वा.चे दरम्यान पदयात्री प्रेरणा चे स्थानिक वडगांव प्रभागात आगमन होताच शहरातील योगनृत्य परीवार व काॅंग्रेस परीवार कडुन बॅन्ड च्या तालावर मिरवणूक काढुन पुष्पवृष्टी करून व पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत करण्यात आले या प्रसंगी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस चे माजी अध्यक्ष नंदु नागरकर,माजी नगराध्यक्षा सौ.सुनिताताई लोढीया,माजी महापौर वसंत देशमुख,संगिता भोयर, राजु बनकर, घनश्याम वासलेकर,महेंद्र मेश्राम,मंगला मडावी यांचेसह बहुसंख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती…