दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनीधी -नवनाथ डिगोळे
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा, मा.सौ.चित्राताई वाघ यांच्या सुचनेनुसार महिला मोर्चा कार्यकारिणीची बैठक भाजप कार्यालय येथे प्रदेश समन्वयिका मा.सौ.संध्याताई देठे व भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथजी मगे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाने संपन्न झाली.महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा मीना ताई भोसले यांनी प्रास्ताविक केले,प्रेरणा होनराव यांनी शिंदे फडणवीस सरकार व विकास, सरचिटणीस काठवटे जी यांनी सोशल मीडिया हा विषय मांडला.मा. जिल्हाध्यक्ष गुरुनाथजी मगे यांनी महिलांनी घरा घरात जाऊन संपर्क करावा. महिला संघटन आणखी वाढवावे व भारतीय अर्थसंकल्प व केंद्रसरकार राबवत असलेल्या विविध योजना सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याबाबत सांगितले.त्याचप्रमाणे प्रदेश समन्वयिका मा.संध्याताई देठे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.मंडल अध्यक्ष निर्मला कांबळे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला व मंडल अध्यक्ष रोहिणी देशमुख यांनी अनुमोदन दिले. तसेच जिल्हाध्यक्ष श्री. गुरुनाथजी मगे साहेब यांची धाराशिव लोकसभा निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल व शोभाताई कोंडेकर यांची जैन प्रकोष्ठ मराठवाडा प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल दोघाची अभिनंदन करण्यात आले. यावेळी बैठकीत महिला मोर्चा च्या सरचिटणीस शोभाताई कोंडेकर, रत्नमाला घोडके व प्रगती डोळसे व लातूरच्या सर्व महिला पदाधिकारी, सर्व मंडल अध्यक्षा ,नगरसेविका, उपस्थित होत्या.
या बैठकीचे सुत्रसंचलन सरचिटणीस सौ. प्रगती डोळसे यांनी केले व दिव्यांग आघाडीच्या अध्यक्षा ज्योती मारकडे यांनी उपस्थित सर्व महिलांचे आभार मानले. या बैठकीचे व्यवस्थापन अफ्रिन खान यांनी केले.
