
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी- शिवकुमार बिरादार
मुखेड -अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत,रयतेचे राजे, स्वराज्य संस्थापक, जाणता राजा, कुळवाडी भूषण,श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव ग्रामपंचायत कार्यालय उंद्री प.दे. ता.मुखेड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ज्येष्ठ नागरिक बालासाहेब कदम शिरशीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्रिवार मानाचा मुजरा करण्यात आला.स्वराज्य संस्थापक, जाणते राजे, कुळवाडी भूषण, रयतेला न्याय मिळवून देण्यासाठी व अन्यायाला जाळून खाक करणारे कर्तबगार वीर पुरुष, रणयोद्धा , कल्याणकारी नेतृत्व, अठरापगड जाती धर्माचे मर्द मावळे एकत्र करून विश्वखंड लढणारे, आयुष्यभर स्वराज्यातील जनतेची काळजी आणि पालन पोषणकरणारे युगपुरुष जिजाऊ रत्न, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर मातीच्या कनावर तलवारीच्या धारीवर स्वराज्याच्या हितरक्षणावर अजरामर कोरलेले स्वर्ण अक्षर म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांच्या विचाराचा वारसा पुढे नेत असताना देशातील स्त्री सुरक्षित राहावी, जातीय मतभेद दूर व्हावेत, धार्मिक एकोपा निर्माण व्हावा, जगाचा पोशिंदा शेतकरी राजाला न्याय मिळावा, शिक्षणातून लेखणीला बळ मिळावे, समतेची पताका फडकत राहावी, सदोदित देशाचे कल्याण व्हावे या विचारांच्या पेरणीसह सर्वांना श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव दिनी त्रिवार मानाचा मुजरा. यावेळी ग्रामपंचायत सदस्य,ग्रामविकास अधिकारी हाळदे सर,माधवराव पाटील वडजे (चेअरमन), हनमंत गनलेवार, गणेश देसाई पवार, रवींद्र पा.पवार, ज्ञानेश्वर पा.वडजे, श्रीराम.पा वडजे, आकाश पा.वडजे, अनिल पा.वडजे, माधव पा.पसारे, राजू पा. सूर्यवंशी, संभाजी पा.भोकरे, मारोती पा.मटके, बालाजी पा.शिंदे (पत्रकार), मारोती पा.वडजे, शिवाजी.पा वडजे. उमेश सोनकांबळे, सुधाकर पा.वडजे, बालाजी.पा पसारे, बंडू महाराज स्वामी यांच्यासह शिवप्रेमी, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.