
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड/प्रेम सावंत
गंगाखेड: तालुक्यातील झोला येथे बौद्ध विहारावर भारतीय बौद्ध महासभा ग्रामीण शाखा झोला व ऑल इंडिया पँथर सेना शाखा झोला यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे शाखाध्यक्ष माधव नरवाडे व ऑल इंडिया पँथर सेनेचे शाखाध्यक्ष आकाश साळवे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी बोलतांना श्रीनिवास नरवाडे यांनी शिवजन्मोत्सवा बद्दल माहिती देताना असे सांगितले की,
१८७० साली महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली “शिवजयंती ” साजरी केली. त्यानंतर १८९५ मध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला.
२०व्या शतकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली होती, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली. ३ मे १९२७ रोजी मुंबई जवळील बदलापूर येथे शिवजयंती उत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरी केली गेली.
या कार्यक्रमास श्रीनिवास नरवाडे, प्रेम सावंत,आकाश साळवे,माधव नरवाडे,मोकिंद साळवे,दयानंद नरवाडे,संजय साळवे,बालाजी साळवे,सचिन साळवे,आकाश घोबाळे,संघर्ष साळवे, बालासाहेब नरवाडे,महेश सावंत,प्रताप भावे
यांच्यासह अन्य पदाधिकारी व बौद्ध उपासक उपस्थित होते.