
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती अंजनगाव सूर्जी :- छत्रपती शिवाजी राजे चौक अंजनगाव सुर्जी येथे शिवभक्त ग्रुपकडून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दर्यापुर,अंजनगाव सुर्जीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे,तसेच पोलीस निरीक्षक वानखेडे,डॉ.विलासराव एन.कविटकर,डॉ.मंगेश राऊत आदींची उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता समस्त शिवभक्त ग्रुप अंजनगाव सुर्जी सहकार्य केले..