
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी वाघोली – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.9
भारताच्या पाकिस्तान, चीन आदी सीमारेषांवर मागील काही काळापासून ड्रोनचा अतिरेकी कारवायांसाठी वापर वाढलेला आहे. संबंधित ड्रोनचा यशस्वी सामना करण्यासाठी वाघोली बाइफ रोड येथे आई-वडिलांसह साई संस्कृती सोसायटीत रहिवासी असलेल्या भारतीय लष्करातील अधिकारी सदानंद चौहान यांनी ड्रोनविरोधी अत्याधुनिक व्यवस्थानिर्मिती केली आहे.
याबद्दल त्यांचे आज श्री शांताराम बापू कटके ( मा कार्यक्षम माजी उपसरपंच वाघोली) यांनी प्रत्यक्ष भेट घेत अभिनंदन करत सन्मान केला. पाकिस्तान लगतच्या पंजाब जम्मू व काश्मीर राज्यातील सीमावर्ती भागात सैन्याच्या हालचाली, ठिकाणे, कॅम्प याबाबतची माहिती संकलित करण्यासाठी शत्रूकडून ड्रोनचा वापर होतो. याबद्दल’फिल्ड डिप्लोएबल सॅटेलाइट नेव्हिगेशन स्नुपिंग सिस्टीम’ (एफएसएनएस) ही प्रणाली जॅमरसारखे काम करते.
या वेळी बापूनी त्यांचे मनापासून कौतुक करून शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी
सोमनाथ आव्हाळे – चेअरमन अनंत प्रतिष्ठान
गणेश हरगुडे – सचिव अनंत प्रतिष्ठान, अबिद शेख- अध्यक्ष अखिल शिवतेज तरुण मंडळ वाघोली आदी उपस्थित होते.