दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष वर्ष 2022- 23 याकरिता गांधी विचार संस्कार परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये एकूण 148 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यामधून धाराशिव जिल्ह्यातून पदवी स्तरातुन द्वितीय वर्षासाठी द्वितीय क्रमांक साक्षी तोष्णीवाल व तृतीय क्रमांक तबससुम शेख यांनी, पदव्युत्तर स्तरातून प्रथम वर्षातून दीपक जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकाविला या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार, उपप्राचार्य प्रो,डॉ.हेमंत भगवान प्रो,डॉ.सतीश लोमटे अंतर्गत गुणवत्ता कक्षेचे समन्वयक डॉ.कमलाकर जाधव,प्रो. ज्ञानेश चिंते, प्रा. प्रा. नितीन अंकुशराव, डॉ. नागनाथ अदाटे,प्रा. तांबोळी, प्रा. अमोल शिंदे, प्रा. दीपक वाळके अरविंद शिंदे, हनुमंत जाधव, महाविद्यालयातील प्राध्यापक व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी आदिने अभिनंदन केले. या परीक्षेचे समन्वयक म्हणून इतिहास विभागाचे विभागप्रमुख लेफ्टनंट डॉ. पावडे के. डब्ल्यू., डॉ. वर्षा सरवदे यांनी काम पाहिले. ही परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉ. श्रीकांत भोसले, डॉ नामानंद साठे, डॉ. हेमंत चांदोरे,प्रा. प्रताप शिंदे, प्रा.सुशील जमाले,डॉ.संदीप महाजन प्रा. अर्चना मुखेडकर,डॉ मीनाक्षी जाधव, प्रा.विलास अडसूळ,प्रा गोविंद काकडे प्रा.महेश मडके, आदिनी मोलाचे सहकार्य केले.
