दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी- दीपक कटकोजवार
महिला सक्षमीकरण करण, प्रोत्साहन, जनजागृती व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला भगिनींनींचा सन्मान व सत्कार करण्याच्या उद्देश्याने चंद्रपूरातील समता संघर्ष फाउंडेशन, मराठी हिंदी पत्रकार असोसिएशन, आणी स्नेहबंध चैरिटेबल ट्रस्ट आदींच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ” राणी हिराई स्त्रिभुषण पुरस्कार 2023″ कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. 12 मार्च 2023 ला स्थानिक पवित्र दिक्षा भुमी वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेच्या महिला आमदार सौ.प्रतिभाताई सुरेश धानोरकर यांनी केले. समाजसेविका मा.अनुताई दहेगांवकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाभल्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूरचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार, शिक्षक आमदार सुधाकरराव अड़बाले, जिल्हा पोलिस अधीक्षक रविन्द्रसिंहजी परदेसी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे सदस्य राहुल घोटेकर यांची तर विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेविका डॉ. रजनीताई हजारे, स्त्रीरोगतज्ञ तथा समाजसेविका डॉ. शर्मिली पोद्दार, ज्येष्ठ समाजसेविका प्रतिभाताई चिलके, आम आदमी पार्टी महिला शहर अध्यक्षा एड.सुनिताताई पाटिल , समाजसेविका एड.इतीकाताई शहा, समाजसेविका रत्नमाला बावणे, शिक्षिका वंदनाताई बोबडे, कल्याणी हुमने पुलिस निरीक्षक, ,समाजसेविका डॉ. भारतीताई दुधानी,वासुदेव खोबरागड़े, कार्याध्यक्ष जनहित संरक्षण परिषद आदी मान्यवरांना आयोजकांनी महिलांचा संन्मान, सत्कार व मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रीत केल्या गेले होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी विश्वरतन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृति पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन करीत सोबतच माता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात शुरुआत केली.त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार केल्या नंतर मान्यवरांनी कार्यक्रमात उपस्थित शेकडो महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सम्मान चिन्ह देऊन सत्कार व सन्मान केला. सत्कारमुर्तींमध्ये प्रामुख्याने पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जर्नलिस्ट नेहा (शंकर) मानकर, जर्नलिस्ट माधुरी दीपक कटकोजवार, समाजसेविका स्माइल सोशल फाउंडेशन सचिव सीमा दीक्षित,शिक्षिका तथा समाजसेविका भुवनेश्वरी अनिल धर्मपुरिवार, समाजसेविका वर्षाताई कोठेकर, समाजसेविका तथा चिकित्सक डॉ. भारती अजय दुधानी, शाहीन शेख व टीम ख्वातीने इस्लाम, अर्चना मानलवार संस्थापिक ज्ञानर्चना अपंग स्नेह बहुउद्देश्यीय संस्था, हॉकी नैशनल चैम्पियन सुषमा बंडू खाड़े, कौसर खान अध्यक्ष शिफा बहुउद्देश्यीय संस्था तथा अल्पसंख्यक अध्यक्ष यंग चांदा ब्रिगेड, रंजना सुनील नगतोड़े समाजसेविका तथा अध्यक्ष स्माइल सोशल फाउंडेशन, सरिता राजेंद्र मालू अध्यक्ष फ्रेंड्स चैरिटी ग्रुप, सुषमा नगराडे समाजसेविका, समाजसेविका रेखा दूधलकर, समाजसेविका पूनम गरड़वा, जनहित संरक्षण परिषद तथा स्माइल सोशल फाउंडेशन समस्त कार्यकर्ता, शारदा गुरुदेव भजन मंडल, नवजीवन योगा ग्रुप, नवगुरुदेव भजन मंडल, स्त्रीशक्ति संगठन, निकिता आनंद दोड़के, भाग्यश्री मेश्राम, अश्विनी ताटकँटीवार आदींचा सत्कार व सन्मान केला.
कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा जीवनकर व एंकर नौशाद शेख यांनी तर आभार डि. एस. ख्वाजा यांनी मानले।
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समता संघर्ष फाउंडेशन अध्यक्ष सुनीलदादा पाटील, मराठी हिंदी पत्रकार असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष व विदर्भ प्रिंट चे जिल्हा प्रतिनिधी डि. एस. ख़्वाजा, कुमार दर्पनचे संपादक व मराठी-हिंदी पत्रकार असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जुंमलवार, हाजी अली, सौरभ धोंगडे, सुनील चौहान, ब्रिजेश तामगंडे, अजय दुर्गे, नितिन गावंडे, मोबीन सय्यद, शिल्पा कांबले आदींनी विषेश परिश्रम घेतले.
