दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:लातूर येथील ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलने आपले वार्षिक स्नेहसंमेलन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरे केले स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्याच्या कलागुणांना संधी देण्याचे व्यासपीठ असते. ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलचे हे स्नेहसंमेलन आपल्या संस्कृतीचे व मातीचे दर्शन घडवण्याची माध्यम ठरले या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी कलागुणा सोबत आपल्या संस्कृतीची नातं जपणाऱ्या व सामाजिक जाणीव जागृत करणाऱ्या कलाकृतीचे अतिशय उत्तमपणे सादरीकरण केले या दर्जेदार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लातूर मधील तालमणी प्रसिद्ध तबलावादक राम बोरगावकर सर तसेच युवा उद्योजक तुकाराम पाटील सर बाबुराव जाधव सर निलेश जी राजमाने अमोलजी इंगळे सोनू डगवाले आसिफ शेख एल सी बी जाधव सर व इतर सर्व प्रमुख अतिथी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश बिरादार सर उपस्थित होते सर्वांनी सर्वांनी मिळून नृत्य देवता नटराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले याप्रसंगी बोलताना माननीय तुकाराम पाटील सरांनी ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल हे लातूरचे वैभव आहे या शाळेत शिक्षणासोबत संस्कार पण पेरले जातात असे मत व्यक्त केले या कार्यक्रमात मलखांब, योगा लाठीकाठी .रोप मलखांब कराटे या सारख्या अवघड असणाऱ्या कलाकृतीचे अतिशय उत्तमपने मुलांनी सादरीकरण करून उपस्थित पालकांची मन जिंकली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनी प्रेरणा चिंते व सहशिक्षिका रामेश्वरी कदम मॅडम तसेच पवार ज्योतीराम सर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रामेश्वर सगरे सरांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्ट सुजित बिरादार सर व सुयेश बिरादार सर यांनी विशेष मेहनत घेतली.
