दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- अनिल पाटणकर
पुणे – शिवकाळापासुन ऐतिहासिक महत्त्व आणि नामवंत पैलवानांची परंपरा लाभलेल्या कल्याण (सिंहगड) येथे माजी जिल्हा परिषद सभापती पुजाताई पारगे यांच्या निधीतून सुरेख आणि तंत्रशुद्ध पध्दतीने बांधण्यात आलेल्या नुतन कुस्ती आखाड्याचे उद्घाटन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले.
नवीन आखाड्याचे पुजन हिंदकेसरी दिनानाथसिंह यांचे हस्ते करण्यात आले या प्रसंगी जुन्या काळातील पैलवान उपस्थित होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन खा.सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते नुतन आखाड्यातील पहिली कुस्ती दोन महिला कुस्तीगीरांमध्ये लावण्यात आली. त्यानंतर आखाड्यात लहान मोठ्या शंभर कुस्त्या झाल्या. उप महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याने इराणचा मल्ल अली इराणी यावर मात केली तर शेवटच्या मानाच्या कुस्तीत पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने अनिकेत मांगडे याच्यावर मात करत मानाची गदा पटकावली.
याप्रसंगी खासदार सुप्रियाताई सुळे यांचेसह मा. जि. प.सभापती पूजाताई पारगे,त्रिंबक मोकाशी, सचिन दोडके, नवनाथ पारगे शशिकांत गायकवाड तसेच अनेक पदाधिकारी,ग्रामस्थ व पंचक्रोशीतील कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
