
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी- इस्माईल महेबूब शेख
====================
निलंगा:दि.२१/०३/२०२३ मागागील दोन दिवसापूर्वी निलंगा मतदार संघातील निलंगा,शिरूर अनंतपाळ,देवणी तालुक्यात आवकाळी पावसाने व गारपिटीने झालेल्या रबी पिकांच्या आणि फळबागांची तात्काळ प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी असे निवेदनाद्वारे निलंगा मतदार संघातील भाजपाच्या पदाधिका-यांनी मागणी केली आहे.
या निवेदनावर तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे,मंगेश पाटील,काशीनाथ गरीबे,संजय दोरवे,दगडू सोळुंके,प्रशांत पाटील,गोविंद चिलगुरे,तानाजी बिरादार,अप्पाराव सोळुंके,तम्मा माडिबोने,युवराज पवार,किशोर लंगोटे,नयन माने,गणेश धुमाळे,गणेश सलगरे,उल्हास सुर्यवंशी,मनोज कोळ्ळे,संतोष शेटे आदिच्या स्वाक्षरी आहेत.