
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी –
नांदेड:- “महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना” नदेड जिल्हा कार्यकारिणी फेरनिवड करण्यात आली. यावेळी सर्वानुमते नांदेड जिल्हाध्यक्ष पदी बिनविरोध संग्राम आनंदराव डीकळे तर सचिवपदी तुळशिरम रामनबईनवाड यांची निवड करण्यात आली. ही प्रक्रिया मुदखेड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गणेश पाटील – बिलोली मारोती हांडे – बिलोली गजानन इंगोले – मुदखेड यांनी काम पाहिले. सर्वप्रथम अगोदरची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. आणि त्यानंतर सर्व तालुकाध्यक्ष किंवा इतर संगणक परिचलक यांना काम करण्याची इच्छा असेल तर प्रामाणिकपणे सांगावे. किंवा नाव सूचित करावे. अशी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विनंती केली. व त्यानंतर प्रत्येक तालुका प्रतिनिधिनी मत व्यक्त केले. त्यावेळी सर्वानुमते जिल्हाध्यक्ष पदी बिनविरोध संग्राम डीकळे, तर सचिवपदी तुळशिराम रामनबईनवाड यांची पुनः वर्णी लागली. तर जिल्हा प्रसिध्दी प्रमुखपदी आनंद गोडबोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष – गोविंद किसन शिंदे – मुदखेड
गणेश माधवराव पाटील – बिलोली , कार्याध्यक्ष- कल्याण पा श्रीरामे – मुखेड विष्णू सीताराम राठोड- भोकर ,कोषाध्यक्ष- रामेश्वर पवार – नायगाव, संपर्क प्रमुख- मारोती शेषेराव हांडे – बिलोली, प्रसिध्दी प्रमुख- आनंद गोडबोले – लोहा, जिल्हा संघटक- शेख खाज्या – अर्धापूर, सोशल मीडिया प्रमुख- निखिल पाटील – देगलूर, सह कोषाध्यक्ष- विनोद वाघमारे – धर्माबाद
सह प्रसिध्दी प्रमुख- उंकेश्वर वारकट – कंधार याप्रमाणे नवीन जिल्हा कार्यकरणी गठित करण्यात आली.
त्यानंतर सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुदखेड मा. तालुकाध्यक्ष प्रवीन कल्यानकर यांच्या सह अनेक संगणक परिचालक महिला व पुरुष उपस्तीत होते.